कार कोसळून पर्यटक ठार

Tourists killed in  car collapses
Tourists killed in car collapses

कोयनानगर -  पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार हुंबरळी रस्त्यावरील पाबळनाला धबधब्याजवळ कामरगाव (ता. पाटण) येथील वळणावरून संरक्षक कठडे तोडून थेट ओढ्यात पलटी झाली. मुसळधार पाऊस सुरू असतानाच झालेल्या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा अंत झाला. काल (ता. ३) रात्री बाराच्या सुमारास घटनेत कार सुमारे २०० फूट खाली दरीत कोसळली. त्यात एकाचा मृतदेह सकाळी सापडला आहे. नितीन शेलार (रा. सातारा) असे संबंधिताचे नाव आहे. त्यांच्यासोबत वैशाख नांबियार (रा. पुणे) त्या कारमध्ये होते. ते अद्याप बेपत्ता आहेत.  

कोयनेजवळच्याच पाबळनाला जवळ घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुणे येथून सहा पर्यटक मित्र कोयनानगर येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. काल रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाल. त्यांनी दोन मोठी वाहने घेऊन काही पर्यटक काल रात्री बाराच्या सुमारास कामरगावला निघाली होती. त्या वेळी पाबळनाला धबधब्याजवळ दुर्घटना घडली. त्यातील चार ते पाच पर्यटक दुसऱ्या कारमध्ये होते. त्यांच्यासमोर कार ओढ्यात पलटी झाली. दुसऱ्या कारमधील पर्यटक सुरक्षित आहेत. कारमध्ये असलेल्या दोघा पर्यटकांची कार पाबळनाला धबधब्याजवळ वळण घेताना ओढ्यात पलटी झाली. 

नितीन शेलार हे कामरगावचे जावई आहेत. ते काल घरी निघाले असताना अपघात झाला. घटनेजवळ शासनाने रेस्क्‍यू ऑपरेशन राबविले आहे. मित्र भेटत नसल्याने शोध घेणाऱ्या दुसऱ्या गाडीतील मित्रांनी त्याबाबतची माहिती येथील पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर मदतीची चक्रे हलली. 

कारमधील नितीन यांचा मृतदेह आज सकाळी कोयनानगरात सापडला. वैशाख यांचा शोध सुरू आहे. कार २०० फूट खोल दरीत अडकली असल्याने मतदकार्यात अडथळा येत आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स व रेस्क्‍यू टीमला  प्रशासनाने पाचारण केले आहे. सायंकाळपर्यंतही कार बाहेर काढण्यात यश आले नव्हते. 

दोघेही एकमेकांचे घनिष्ठ मित्र 
वैशाख नांबियार व नितीन शेलार हे दोघेही वडगाव शेरीत राहात होते. दोघांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. वैशाख हे त्यांच्या पत्नीसह न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास होते. मात्र पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. नितीन हे इंडियन ऑइल कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. ते लोहगाव विमानतळावर कंपनीच्या एका विभागात कार्यरत होते. दोघेही मित्रांबरोबर रविवारी कोयना धरणाच्या परिसरामध्ये वर्षाविहारासाठी गेले होते. तेथून परतत असताना कोयना घाटात झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची घटना त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. वैशाख यांची पत्नी न्यूझीलंडमध्ये व आई-वडील वडगाव शेरीत राहतात; तसेच नितीनचे कुटुंबीय वडगाव शेरीत वास्तव्यास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com