राज्यात हवामान कोरडे; 'बुलबुल' बंगालच्या उपसागरावर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

पुणे : कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु रविवार (ता. 10) पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर, 'बुलबुल' चक्रीवादळाने अतितीव्र स्वरुप धारण केले असून, ते सध्या उत्तर-पश्‍चिम बंगालच्या उपसागरावर आहे. मात्र, या चक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवणार नाही.

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यासह काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात रविवारी आकाश अंशत : ढगाळ राहील. तसेच, मेघगर्जनेसह हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. सोमवारीही आकाश अंशत : ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान 32 अंशावर आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली.

देशातील प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअस) आणि पाऊस (मिलिमीटर)
शहर कमाल तापमान किमान तापमान पाऊस
पुणे 30.2 17 निरंक
मुंबई 30.2 23.5 3.6
नवी दिल्ली 30.1 15.6 निरंक
चेन्नई 34.7 26.2 निरंक
कोलकाता 26.5 22.6 19.7

महाबळेश्‍वरमध्ये तापमान 13 अंशावर
राज्यात सर्वांत कमी तापमान महाबळेश्‍वर येथे 13 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. अन्य काही शहरांपैकी नगरमध्ये 14.6, नाशिक 17.6, सातारा 15, कोल्हापूर 20.1, सांगली 19.5 आणि नागपूर शहरात 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. तर, गोव्यात (पणजी) येथे किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bulbul on the Bay of Bengal and Weather dry in the state