राजीनाम्याचे वृत्त खोटे - बारणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

पिंपरी - मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर ‘मावळ’चे शिवसेना खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी राजीनामा दिल्याची बातमी सोमवारी (ता.२६) रात्री ‘व्हॉटस्‌अप’वर व्हायरल झाली आणि क्षणार्धात ‘सोशल मीडिया’त ती चर्चेचा विषय ठरली. 

दरम्यान, यामुळे बदनामी झाल्याने ही खोटी बातमी पसरविणारी व्यक्ती आणि ग्रुपविरुद्ध बारणे यांनी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (सायबर सेल) मंगळवारी (ता.२७) तक्रार दिली. ही अफवा पसरविण्यामागे राजकीय विरोधकांचा डाव असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

रात्री साडेनऊच्या सुमारास बारणे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त एका व्हॉट्‌सअप ग्रुपवर पडले आणि हा मेसेज फॉरवर्ड झाल्याने लगेच ते सर्वत्र पसरले. या संदर्भात त्यांच्या स्वीय सहायकाने मंगळवारी लेखी तक्रार पोलिसांत दिली. त्यानुसार हा संदेश टाकणारा आणि तो दुसरीकडे फिरविणारा अशा दोघांची नावे सायबर सेलने निष्पन्न केली आहेत; तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल  करण्यासाठी ही तक्रार वाकड पोलिसांकडे पाठविली आहे. दरम्यान, ही तक्रार वा संबंधित तक्रारदार येताच गुन्हा दाखल केला जाईल, असे वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी स्पष्ट केले.

बारणे म्हणाले, ‘‘मराठा असल्याचा अभिमान आहे. मात्र, राजकीय कारकिर्दीत मी कधीही जातीभेद केला नाही. पक्ष व पक्षप्रमुखांनी खासदारकीची संधी दिली ती केवळ मराठा म्हणून नाही; तर चांगला कार्यकर्ता व माझ्या कामांमुळेच. इतर पक्षांत जशी जात पाहिली जाते, तशी शिवसेनेत कधीही जात विचारली जात नाही. ठाकरे कुटुंब मराठ्यांच्या विरोधात नसून त्यांनी नेहमी मराठी माणूस व मराठी समाजाचा आदर केला आहे. शिवसेनेत १८ पैकी १३ खासदार हे मराठा समाजाचेच आहेत.’’ 

Web Title: False resignation news - Barne