मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी; हवामान विभागाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मध्य महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने पुढील तीन दिवस रेड अलर्ट कायम ठेवला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.

पुणे : मध्य महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने पुढील तीन दिवस रेड अलर्ट कायम ठेवला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. येत्या बुधवारी या भागात वाऱ्याचा वेग वाढलेला असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ओरीसामधील बालासोर किनारपट्टीपासून १६० किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील चोवीस तासात याची तीव्रता वाढून अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात याचे रूपांतर होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall in central Maharashtra; Forecast of the Meteorological Department