मुख्यमंत्र्यांना महिलांची भीती वाटते का?; पोलिस बंदोबस्तानंतर रुपाली चाकणकर गरजल्या

विठ्ठल तांबे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे :  भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तुम्हाला महिलांची भीती वाटते तर, कशाला महा ‘धना’देश यात्रा काढता, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे.

पुणे :  भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तुम्हाला महिलांची भीती वाटते तर, कशाला महा ‘धना’देश यात्रा काढता, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे.

आणखी वाचा : Vidoe: ‘राजे चाललेच नाहीत, तर त्यांना अडवणार कसे?’; पाहा कोणी केली टीका

सकाळपासून बंदोबस्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून महाजनादेश यात्रेनिमित्त पुण्यात होते. आज रविवारी मुख्यमंत्री खडकवासला मतदारसंघातून सिंहगड रस्त्याने सातारला जाणार होते. महाजनादेश यात्रेला विरोध होऊ नये म्हणून, पोलिसांनी आधीच तयारी केली होती. महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात येतील, या शक्यतेने पोलिसांनी चाकणकर यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला होता. या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी सकाळला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री महोदय, आपण सकाळपासून माझ्या घरी फौजफाटा तैनात केला आहे. तुम्हाला महिलांची इतकी भिती वाटते तर, कशाला काढता महा‘धना’देश यात्रा काढता. हिच पोलिसांची सुरक्षा महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षितेसाठी वापरा, बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना कमी होतील.’

आणखी वाचा : मुंबईत बटनवाली टॅक्सी दिसली की तोडणार : नांदगावकर

आमचचं दुदैव : चाकणकर
चाकणकर म्हणाल्या, ‘दुदैव आमचं आहे. तुमच्यासारखं महिलांवर हुकुमशाही करणारं सरकार महाराष्ट्राला मिळालं. ही  जनादेशयात्रा नसून धनादेश यात्रा आहे. या यात्रेसाठी पुण्यातील वृक्षसंपदेवरही कुऱ्हाड घालण्यात आली. झाडांची ओळख असणारे शहर अशी आहे. परंतु, भाजपने ती ओळख पुसण्याचाही प्रयत्न केला. पुण्याला स्मार्ट सिटी करायचे राहू द्या. धनादेश यात्रेने पुणे ‘फ्लेक्स सिटी’ मात्र नक्की झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader rupali chakankar reaction after devendra fadnavis maha janadesh rally police security