PuneRains: पुण्यात ‘या’ भागात उद्या मिळणार नाही पाणी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुणे : पावसामुळे महापालिकेच्या पद्मावती जलकेंद्रात पाणी शिरले असून, त्यामुळे या केंद्रातील आठ पंप जळाले आहेत. तसेच, दांडेकर पूल, कात्रज (राजीव गांध प्राणिसंग्रहालय) सिंहगड रस्ता (सनसिटी) आणि येवलेवाडीतील नाल्यांवरून टाकलेल्या जलवाहिन्याही वाहून गेल्या आहेत.

PuneRains: पुणे : पावसामुळे महापालिकेच्या पद्मावती जलकेंद्रात पाणी शिरले असून, त्यामुळे या केंद्रातील आठ पंप जळाले आहेत. तसेच, दांडेकर पूल, कात्रज (राजीव गांध प्राणिसंग्रहालय) सिंहगड रस्ता (सनसिटी) आणि येवलेवाडीतील नाल्यांवरून टाकलेल्या जलवाहिन्याही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे पद्मावती जलकेंद्रातर्गंत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, त्याच्या दुरुस्तीचे काम पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. तसेच, वाहून गेलेल्या जलवाहिन्यांची कामे होती घेतली असली तरी त्यातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (27 सप्टेंबर) सकाळी बंद राहणार आहे.

पुण्यात ढगफुटी झाली की नाही? तज्ज्ञ काय सांगतात?

दरम्यान, दांडेकर पूल आणि सनसिटी येथील वाहिन्यांची कामे गुरुवारी (26 सप्टेंबर) बारा वाजेपर्यंत पूर्ण होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा अंदाज महापालिकेने वर्तविला, तर कात्रज आणि येवलेवाडीतील कामे शुक्रवारी (27 सप्टेंबर) दुपारपर्यंत पूर्ण होतील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. तर, विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी कात्रज, येवलेवाडी, दांडेकर पूल आणि सनसिटी येथील ओढ्या-नाल्यांवरून वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे नाल्यांत पाणी पाणी आल्याने त्या वाहून गेल्या. तर पद्मावती जलकेंद्रात प्रचंड पाणी साचल्याने तेथील आठ पंप जळाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलकेंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणेकरांनो जाणून घ्या पावसाचा जोर कधी होणार कमी (व्हिडिओ)

या भागांतील पाणीपुरवठा बंद (पद्मावती जलकेंद्र) : बिबवेवाडी टाकी : बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, गंगधाम, बिबवेवाडी गावठाण, माकर्केटयार्ड, गुलकटेकडी, इंदिरानगर झोपडपट्‌टी, डायस प्लॉट, महर्षीनगर अंशत:, न्यू इरा सोसायटी, बुराणी कॉलनी, पीएमपी कॉलनी, संदेशनगर, विद्यासागर कॉलनी, सोपान महाराज, बिबवेवाडी कोठारी ब्लॉक, बिबवेवाडी ओटा, लोअर इंदिरानगर, वसंतबाग, पारिजात, अतनिकेत सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, आंबेडकरनगर परिसर.
तळजाई गोल : पद्मावती परिसर, संभाजीनगर, चव्हाणनगर, तळजाई वसाहत, अहिल्यादेशी चौक, के के. मार्केट, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, अप्पर-सुपर, लेक टाऊन, बालाजीनगर, गुलाबनगर परिसर, इत्यादी.
सेमिनरी टाकी : वर्धमानपुरा, स्वयंभू सोसायटी, पापळवस्ती,पोकळेवस्ती, शिवतेजनगर, महेश सोसायटी, मिठानगर, शिवनेरीनगर, अप्पर-सुपर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर,भाग्योदयगर,
दांडेकर पूल वाहिन्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : शास्त्री रस्ता परिसर, लोकमान्य कॉलनी, नवी पेठ परिसर, लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज), पूना हॉस्पिटल, राजेंद्र नगर, वैकुंठ, डेक्कन, पुलाची वाडी,प्रभात रस्त्यावरील सर्व गल्ली,

टँकरने होणार पाणीपुरवठा
दरम्यान, पद्मावती जलकेंद्राच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याने या केंद्रातून पुरवठा होणाऱ्या भागांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जलकेंद्रातून टॅंकर सोडण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, लोकांना पाणी कमी पडू देणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rains water crisis in some part of city on 27th september pmc