येवल्यात उन्हाळ कांद्याच्या आवकसह बाजारभावातही घसरण 

onion.jpg
onion.jpg

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारासह अंदरसूल उपबाजारात सप्ताहात उन्हाळ कांद्याच्या आवकेसह बाजारभावात घसरण झाली. सरासरी बाजारभाव २ हजार ४०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात येवला व अंदरसूलला उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांत व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती.

सप्ताहात कांदाआवक २१ हजार ८२७ क्विंटल झाली.

कांद्याचे बाजारभाव किमान ७०० ते तीन हजार एक, तर सरासरी दोन हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे आवक पाच हजार २१ क्विंटल झाली. बाजारभाव ७०० ते दोन हजार ९१६, तर सरासरी दोन हजार ४०० प्रतिक्विंटलपर्यंत होते. गहू व मुगाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हाची एकूण आवक १७ क्विंटल झाली असून, बाजारभाव एक हजार ९६० ते दोन हजार ४५१, तर सरासरी दोन हजार ५० पर्यंत होते. मुगाची आवक १८४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान तीन हजार ८०० ते कमाल सात हजार ६५१, तर सरासरी पाच हजार ६०० रुपयांपर्यंत होते. तसेच सप्ताहात बाजरी, मका, सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली. तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीची आवक एक हजार ७२ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान एक हजार ४५१ ते कमाल दोन हजार १२५, तर सरासरी एक हजार ६२० पर्यंत होते. सोयबीनची एकूण आवक एक हजार ९३१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान दोन हजार ९५१ ते माल ३६००, तर सरासरी ३३५० पर्यंत होते. तर मक्‍याची एकूण आवक चार हजार 381 क्विंटल झाली असून, बाजारभाव एक हजार ३२५ ते दोन हजार २००, तर सरासरी एक हजार ७०० प्रतिक्विंटलपर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com