केबीसी लकी ड्रॉ चे मेसेज तुम्हालाही येतात? तर वाचा..

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे कोणतीही घटना किंवा माहिती काही क्षणार्धात व्हायरल होत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा स्मार्टफोन आणि सोशल मीडियात वावर वाढल्याने ऑनलाईन गुन्हेगारांकडून या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. सण-उत्सवात लकी ड्रॉ, ऑनलाईन गिफ्ट हॅम्पर, लॉटरी विनर यांसारख्या छायाचित्रांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या अमिषातून अनेक लोकांची फसवणुक होत असल्याचे निदर्शनात आले आहे. 

नाशिक : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे कोणतीही घटना किंवा माहिती काही क्षणार्धात व्हायरल होत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा स्मार्टफोन आणि सोशल मीडियात वावर वाढल्याने ऑनलाईन गुन्हेगारांकडून या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. सण-उत्सवात लकी ड्रॉ, ऑनलाईन गिफ्ट हॅम्पर, लॉटरी विनर यांसारख्या छायाचित्रांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या अमिषातून अनेक लोकांची फसवणुक होत असल्याचे निदर्शनात आले आहे. 

लकी ड्रॉचे छायाचित्रांसह ऑडिओ व व्हिडिओ होतोय व्हायरल 
कमी वेळात, विना काही कष्ट केल्याने पैसा मिळविण्याच्या उद्देशाने लोकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे, एक मेसेज फॉरवर्ड केल्याने तुम्हाला त्याचे पैसे मिळणार अशा प्रकारचे मेसेजच्या विळख्यात देखील सोशल मीडिया व इंटरनेटचे वापरकर्ते अडकल्याचे दिसून येते. दरवर्षी कोन बनेगा करोडपती कार्यक्रम सुरु झाला की, सोशल मीडियावर लकी ड्रॉची इमेज व्हायरल होते. आता तर याबाबत व्हिडिओ व ऑडिओ देखील पसरले आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग जरी नाही घेतला तरी तुमच्या व्हॉट्‌सअप नंबरचा लकी ड्रॉ साठी सिलेक्‍शन झाल्याने तुम्हांला २५ लाख रुपये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हांला सांगितलेल्या नंबर सेव्ह करुन व्हॉट्‌सअप मेसेज कॉल करण्याचे बोलले जाते. अशा बनावट मेसेजने कोणी सुद्धा सायबर ट्रॅप सापळे विविध प्रकारे बनवून लोकांना अडकू शकतात. केबीसी प्रमाणेच  नापतोल लॉटरीचा देखील असाच प्रकार आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सहजच मोबाईल नंबर व वापरकर्त्याचे नाव माहित करुन घेऊन हॅकर्स हे बॅंक खात्यातून पैशाची उलाढाल करु शकतात. त्यामुळे फसव्या मेसेजच्या विळख्यात न अडकता सावध होणे गरजेचे झाले आहे. 

प्रतिक्रिया
इंटरनेट किंवा सोशल मीडियावर आलेली सर्वच माहिती सत्य नसते. त्यामुळे त्याबाबत विश्‍वासार्ह माहिती मिळत नाही असे मेसेज व ऑडिओ, व्हिडिओ सेंड करु नये. एक चुकीचा मेसेज कुणाला तरी लाखोंचा गंडा लावू शकतो. प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. - तन्मय दिक्षीत, सायबर तज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware Messages from KBC Lucky Draw also come to you