Vidhan Sabha 2019 : नाशिक विभागात ५० हजार दिव्यांग मतदारांची नोंद 

disabled voting.jpg
disabled voting.jpg

नाशिक : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या सोमवारी (ता.२१) विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व नगर या पाचही जिल्हयात एकूण ५० हजार ९१८ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान करावे. यासाठी निवडणुक प्रशासन सरसावले आहे. निवडणुक प्रशासनाच्या मदतीला विभागातील अनेक दिव्यांग स्वयंसेवी व सेवाभावी संस्थाही धावून आल्या आहेत. दिव्यांगांच्या जास्तीत जास्त मतदानासाठी विभागात पथनाट्य, भित्तीपत्रके, रॅली, कार्यशाळा व बैठकातून जनजागृती सुरु आहे. 

विभागात ५० हजार दिव्यांग मतदारांची नोंद

विभागातील ४७ विधानसभा मतदार संघातील ४९३७ ग्रामपंचायतीत १३ हजार ९९० मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार नोंदणी झाली. जिल्हा निवडणूक कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत. विभागात नाशिक - १२१३५, धुळे - ६३७३, नंदुरबार - २८२८, जळगांव - १४९७२ व नगर - १४६१० अशा एकूण ५०९१८ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली. यात अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद व इतर व्याधी असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. ज्या दिव्यांगांना मतदान केंद्रावर जाणे शक्‍य होणार नाही. अशा मतदारांसाठी निवडणुक प्रशासनाने १३९९० मतदान केंद्रावर १३१९ वाहने व ४८२९ दिव्यांग साधने व्हील चिअर, वॉकर, काठीची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनासोबत मदतनीस , विशेष मदतनीस, ब्रेल लिपीची आवश्‍यकता असलेल्या मतदारांना आवश्‍यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

ब्रेल लिपीतील मतपत्रिका 
मुख्य सचिवांनी सर्व महसूल विभागीय आयुक्तांची समन्वयक अधिकारी तर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्तांची सह समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मतदारांना निवडणुक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वैद्यकिय पेटी, दिव्यांग मतदार सुविधा भित्तीपत्रके व अल्पोहाराची व्यवस्था प्रत्येक जिल्हा निवडणुक प्रशासनाने केली आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिकेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

दिव्यांगांसाठी 'पीडब्ल्यूडी ऍप' 
दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने पीडब्ल्यूडी ऍप कार्यान्वित केले होते. दिव्यांगानी मतदानासाठी व्हीलचेअर,स्वयंसेवक, रम्पच्या सुविधेसाठी पीडब्ल्यूडी ऍपच्या माध्यमातून व्हीलचेअरसाठी नोंदणी करायची आहे. निवडणूक विषयक तक्रारीसाठी दिव्यांगाना ऍपचा वापर करता येणार आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com