कॉंग्रेसने 11 जागा द्याव्यात, अन्यथा आम्हीही स्वबळावर-प्रा.जोगेंद्र कवाडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नाशिक ः रिपब्लिकन आघाडीने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडे 11 जागा मागितल्या आहेत. त्याबाबत ऑगस्टअखेरपर्यंतच आम्हाला शब्द हवा आहे. जागा न मिळाल्यास स्वबळावर लढणार असल्याचा इशारा रिपब्लिकन जनशक्ती आघाडीचे निमंत्रक प्रा. जागेंद्र कवाडे यांनी दिला. 

नाशिक ः रिपब्लिकन आघाडीने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडे 11 जागा मागितल्या आहेत. त्याबाबत ऑगस्टअखेरपर्यंतच आम्हाला शब्द हवा आहे. जागा न मिळाल्यास स्वबळावर लढणार असल्याचा इशारा रिपब्लिकन जनशक्ती आघाडीचे निमंत्रक प्रा. जागेंद्र कवाडे यांनी दिला. 

रिपब्लिकन आघाडीचे निमंत्रक प्रा. कवाडे नाशिकला आले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे गणेश उन्हवणे, सुनील निकाळजे, शशिकांत उन्हवणे आदी उपस्थित होते. 
प्रा. कवाडे म्हणाले, की "रिपब्लिकन' हा फक्त पक्ष नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. डॉ. आंबेडकरांचा विचार टिकविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन जनशक्ती आघाडीचा निर्णय आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातील नाना इंदिसे, राजेंद्र गवई, गंगाधर गाडे, रिपाइं डेमोक्रॅटिकचे जी. के. डोंगरगावकर, खोब्रागडे गटाचे उपेंद्र शेंडगे, राष्ट्रीय दलित पॅंथरचे नाना भालेराव आदींसह विविध गटांचे नेते एकत्र आले आहेत.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र आलेली महाआघाडी रिपब्लिकन विचार मजबुतीने उभा राहावा यासाठी आगामी विधानसभा निवडणुका लढेल. रिपब्लिकन आघाडीने कॉंग्रेस पक्षाला 33 जागांची मागणी केली आहे. मात्र त्यांपैकी 11 जागा आघाडीला हव्याच आहेत. 
कॉंग्रेस व मित्रपक्षांसोबत निवडणुका लढताना जागांची मागणी करतो. मात्र कॉंग्रेसकडून जाणीवपूर्वक जागावाटपाचा घोळ अखेरपर्यंत घातला जातो. अखेरच्या क्षणी जागा कमी केल्या जातात. हे टाळण्यासाठी या वेळी आम्ही यापूर्वीच कॉंग्रेस पक्षाकडे 33 जागांची मागणी करत,

31 ऑगस्टपर्यंत 11 जागा कोणत्या याचा निर्णय मागितला आहे. कॉंग्रेसने ऑगस्टअखेर जागांबाबत न कळविल्यास रिपब्लिकन जनशक्ती आघाडी सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. त्यात नाशिकमधील देवळाली, निफाड आणि नाशिक पूर्व हे मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाकडे मागितले आहेत. 

अहंकार बाजूला ठेवा 
खासदार रामदास आठवले यांची सत्तेसोबत आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांबद्दल श्रद्धा असती तर त्यांनी यापूर्वीच त्यांच्या वंचित बहुजन आघाडीत रिपब्लिकन पक्षाच्या गटांना सामावून घेतले असते. त्यामुळे ऍड. आंबेडकर रिपब्लिकन विचार मानत असतील तर आमच्यासोबत यावे. रिपब्लिकन स्वाभिमान टिकविण्यासाठी नेत्यांनी अहंकार बाजूला ठेवून साध द्यावी, असे आवाहन प्रा. कवाडे यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news congress ultimatumT