देशभरातील 43 महिलांना वशीकरण करणारा भामटा दिल्लीतून जेरबंद

विनोद बेदरकर : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नाशिक ः वशीकरण स्पेशालिस्ट असल्याचे सांगून न्यूझीलंड कॅनडा, दिल्ली,वसईपासून तर नाशिकपर्यत विविध भागातील 43 महिलांना फसविणाऱ्या दिल्लीतील एका 23 वर्षीय भोंदूबाबाला नाशिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. रुदर शर्मा, खान बाबा अजमेर यासह विविध बोगस नावाने बॅकांमध्ये ऑनलाईन पध्दतीने पैसे मागवून तो महिलांना फसवित असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या एका तक्रारीच्या तपासात नाशिक सायबर क्राईम ब्रॅचच्या पोलिस पथकाने दिल्लीत जाउन कथित बाबाच्या मुसक्‍या आवळल्या.

  येत्या 4 सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. विविध भाषावर प्रभूत्व असलेल्या आणि अस्सलखित उर्द्दू बोलून व्हॉटसऍप व फेसबुकच्या माध्यमातून त्याने अनेक महिलांना लाखोचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवराज बोरसे, रविंद्र भोसले, संतोष काळे, राहूल जगझाप, मंगेश्‍वर काकुळदे आदीच्या पथकाने दिल्लीत जाउन ही कारवाई केली. 

बोगस कॉल सेंटरचा पदार्फाश 
दुसऱ्या एका गुन्ह्यात याच पथकाने दिल्लीतून तुमचे एटीएम खराब झाल्याचे घाउक फोन करुन एटीएम कार्ड बदलाच्या नावाखाली ओटीपी मिळवून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका दिल्लीतील कॉल सेंटरचा पदार्फाश केला आहे. त्यात निशांत कुमार ओमप्रकाश सिंग, मोहमद फैजल, तरुणकुमार सिंग मथुरा उत्तरप्रदेश यांना अटक केली आहे. त्यांनी 
नाशिकमधील बॅक धारकांना दोन लाखांना गंडविले आहे. त्यांच्याकडून 89 सिम कार्ड 10 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news fraud person