'या'धरणातील पाणीसाठ्यामुळे पाणीसह शेतीसिंचनाचा मिटला प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पावसाळ्याचे तब्बल तीन महिने कोरडे राहिलेल्या व नांदगाव-चाळीसगाव तालुक्‍यातील हद्दीवर असलेल्या मन्याड धरणात एकाच महिन्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे व त्यातील ओव्हरफ्लोमुळे ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. 

वेहेळगाव : पावसाळ्याचे तब्बल तीन महिने कोरडे राहिलेल्या व नांदगाव-चाळीसगाव तालुक्‍यातील हद्दीवर असलेल्या मन्याड धरणात एकाच महिन्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे व त्यातील ओव्हरफ्लोमुळे ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. 

मन्याड धरणात ६० टक्के पाणीसाठा 

नांदगाव तालुक्‍यातील पळाशी, वेहेळगाव, मंगळणे, सावरगाव, आमोदे या गावांना शेती व काहीअंशी पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. 
मागील वर्षी धरणात शून्य टक्के पाणी होते. धरण कोरडे झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी भरपूर प्रमाणात गाळ उपसा करून त्याची पात्रता वाढवली. १९०५ दशलक्ष घनफूट आहे. यातील मृतसाठा ४८३ दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्र २१७७ एकर म्हणजे ८७१ हेक्‍टर असून, त्यापैकी ४०० एकर क्षेत्र लिफ्टवर भिजते आणि ६५०० हेक्‍टरात खरीप व रब्बी हंगाम निघतो. 
मन्याडवर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुयोजनांना दिलासा मिळणार आहे. गतवर्षी मन्याडमध्ये पाणी नसल्याने मन्याडवर अवलंबून असलेला पाणीयोजना कोरड्याठाक पडल्या होत्या. परिणामी, गावांमध्ये गतवर्षी पावसाळ्यापासून टॅंकर सुरू करावे लागले होते. यंदा मात्र 60 टक्के का होईना साठा झाल्याने पिण्याच्या पाण्याची व रब्बी हंगाम निघण्याची शक्‍यता असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

मागील वर्षी मन्याड धरणात शून्य टक्के पाणीसाठा होता
मागील वर्षी मन्याड धरणात शून्य टक्के पाणीसाठा होता. मात्र, पावसाळ्याच्या शेवट का होईना माणिकपुंज धरणाच्या ओव्हरप्लोमुळे मन्याड धरणात पाणी आले. त्यामुळे आमचा पिण्याचा पाण्याचा व रब्बी हंगाम निघणार असून, आम्ही आनंदी आहोत. -रोहिदास शेळके, शेतकरी मंगळणे 
 
कुठल्या वर्षी धरण किती टक्के भरले? 
2012-13 --- -12 टक्के 
2013-14-----100 
2014-15----- 49 
2015-16------18 
2016-17-----100 
2017-18----63 
2018-19---0 
2019-20-- 60 टक्के  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The question of agricultural irrigation with water due to manyad dam water storage is erased