लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार 

Rape.jpg
Rape.jpg

नाशिक : सिडकोत राहणाऱ्या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच, सव्वा दोन लाखांची रोकड व सोन्याची चैन घेत फसवणूक करणाऱ्या संशयिताविरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शिवाजी काळे (रा. दौलतनगर, सिडको, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. 

रोकड अन्‌ दागिनेही लुबाडून फसवणूक  
पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक याच्यासमवेत काही महिन्यांपूर्वी लग्नाकरिताच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संशयिताने लग्न करण्याचेही आमिष दाखविले होते. दोघेजण भाड्याने खोली पाहण्यासाठी सावतानगर येथे गेल्या जून महिन्यात गेले होते. त्यावेळी त्या खोलीत संशयिताने पीडितेशी अंगलटपणा केला आणि आज ना उद्या आपले लग्न होणारच आहे असे म्हणून पीडितेच्या मनाविरुद्ध तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, (ता.१०) जुलैला संशयिताने पीडितेकडून २ लाख ३५ हजार रुपये उसनवार घेतले होते. तसेच, त्यानंतर त्याने पीडितेकडून दोन तोळ्याची सोन्याची चैनही घेतली होती. पीडितेने विश्‍वासाने सदरची रोकड व ऐवज दिला असता, संशयिताने त्याचा अपहार केला. तसेच पीडितेने विवाहाचा विषय काढला असता, संशयिताने परत लग्नाचा विषय काढला तर जीवे ठार मारून अपघातात मयत झाल्याचे सिद्ध करू अशी धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला उपनिरीक्षक गवांदे या तपास करीत आहेत


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com