Vidhansabha 2019 नाशिकच्या 15 मतदारसंघांमधून 72 उमेदवारांनी दाखल केले अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन आघाडी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

आज अर्ज दाखल केलेले उमेदवार 
नांदगाव ः पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), सुहास कांदे (शिवसेना), संजय पवार आणि रत्नाकर पवार (अपक्ष) 
मालेगाव मध्य ः आसिफ शेख (कॉंग्रेस), मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीफ (एम. आय. एम.), इब्राहीम शेख (भाजप) 
बागलाण ः दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी), दिलीप बोरसे (भाजप), पोपट अहिरे (राष्ट्रवादी), गणेश अहिरे (कॉंग्रेस), रेखा पवार (कॉंग्रेस), यशवंत पवार (कॉंग्रेस) 
कळवण-सुरगाणा ः नितीन पवार (राष्ट्रवादी), जे. पी. गावीत (मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष) 
चांदवड-देवळा ः शिरीषकुमार कोतवाल (कॉंग्रेस), डॉ. राहूल आहेर (भाजप) 
येवला ः संभाजी पवार (शिवसेना), नरसिंह दरेकर (मनसे) 
सिन्नर ः ऍड्‌. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
निफाड ः दिलीप बनकर (राष्ट्रवादी) 
दिंडोरी-पेठ ः धनराज महाले (शिवसेना), नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), अरुण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) 
नाशिक मध्य ः प्रा. देवयानी फरांदे (भाजप), दीपक डोके (वंचित बहुजन आघाडी) 
नाशिक पश्‍चिम ः सीमा हिरे (भाजप), डॉ. अपूर्व हिरे (राष्ट्रवादी आणि अपक्ष) 
देवळाली ः योगेश घोलप (शिवसेना), ऍड्‌. अमोल पठाडे (बहुजन समाज पार्टी), गौतम वाघ (वंचित बहुजन आघाडी) 
इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर ः हिरामण खोसकर (कॉंग्रेस), निर्मला गावीत (शिवसेना) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Vidhansabha Election