वोट कर..नाशिककर...

vote nashik.jpg
vote nashik.jpg

नाशिक : महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ व्हावी. यासाठी नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतुन विविध सामाजिक संस्थाच्यावतीने ‘वोट कर..नाशिककर..’ या घोषवाक्यात पंचवटीत-आठवडे बाजारात ठिकठिकाणी जनजागृती रॅलीव्दारे नाशिककर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

विविध सामाजिक संस्थाकडून मतदान जनजागृती रॅली 

पंचवटी,रविवारकारंजा,मेनरोड,एम.जी.रोड या आठवडे बाजार भागात घरगुतीसह दिवाळी खरेदी करण्यासाठी आलेले नाशिकर जनता व आठवडे बाजारातील जनतेला महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासंदर्भात नाशिक मधील विविध सामाजिक संस्था व संघटनांनी बुधवारी (दि.16) रोजी जनतेमध्ये जाऊन मतदान हा भारतीय राज्य घटनेने दिलेला अमुल्य असा अधिकार नसुन ते आपले आद्य कर्तव्य आहे हे पटवुन दिले. मतदान करणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणेचे प्रतिकच आहे. आम्ही नाशिककर मतदान करणारच अशी शपथ देखील याप्रसंगी घेण्यात आली. या प्रसंगी नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था,अखिल भारतीय क्षत्रिय महासभा,गोदावरी गटारीकरण विरोधी मंच,महर्षी चित्रपट संस्था,सक्षम सोशल फाऊडेशन,रुक्मिणी चँरिटेबल ट्रस्ट,आँल इंडिया अँन्टी करप्शन बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. यावेळी निशिकांत पगारे,सुनिल परदेशी,रोहित कानडे,तेजश्री उखाडे,प्रकाश बर्वे,सोमनाथ मुठाळ,सौ.वैशाली चव्हाण,स्नेहल ठाकरे,संजना पगार यांनी आपल्या अथक प्रयत्नात जनजागृतीतून मतदार नागरिकांना मतदानासाठी प्रबोधन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com