पाच माओवाद्यांची शरणागती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत नुकतेच एकूण 20 लाख रुपये बक्षिस असलेल्या 5 जहाल माओवाद्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक हरी बालाजी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे. शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये साईनाथ ऊर्फ सत्तू चक्कु पोदाळी (26), दिना ऊर्फ सन्नी मंगल पंगाटी (20), सुशिला ऊर्फ ज्योती ऊर्फ मदनी लक्ष्मण तलांडी (28), राजेश ऊर्फ राज याकब कुजर (36) व मंगेश ऊर्फ विजय बाज गावडे (32) या पाच जणांचा समावेश आहे.

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत नुकतेच एकूण 20 लाख रुपये बक्षिस असलेल्या 5 जहाल माओवाद्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक हरी बालाजी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे. शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये साईनाथ ऊर्फ सत्तू चक्कु पोदाळी (26), दिना ऊर्फ सन्नी मंगल पंगाटी (20), सुशिला ऊर्फ ज्योती ऊर्फ मदनी लक्ष्मण तलांडी (28), राजेश ऊर्फ राज याकब कुजर (36) व मंगेश ऊर्फ विजय बाज गावडे (32) या पाच जणांचा समावेश आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एक कंपनी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्यासह विविध दलमच्या तब्बल 40 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Web Title: five maoist surrendered