विदर्भात युतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी

file photo
file photo

नागपूर : अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी विदर्भातील सर्व मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये युतीचे उमेदवार अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपचे संजय देशमुख (दिग्रस), आमदार राजू तोडसाम (आर्णी), सीमा सावळे (दर्यापूर), राजेश बकाणे (देवळी), आमदार चरण वाघमारे (तुमसर), विनोद अग्रवाल (गोंदिया), धनराज मुंगले (चिमूर), सुरेंद्रसिंह चंदेल (आरमोरी) या, तर शिवसेनेच्या विश्वास नांदेकर (वणी), संतोष ढवळे (यवतमाळ), डॉ. विश्वनाथ विनकरे (उमरखेड), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), किशोर कुमेरिया (दक्षिण नागपूर), अशोक शिंदे (हिंगणघाट), आशीष जयस्वाल (रामटेक) या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेतला व त्याची उमेदवारीही मिळविली. ते बुलडाण्यातून उभे आहेत.
त्या तुलनेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोरांना समजावण्यात नेतृत्वाला यश आले. कॉंग्रेसचे सेवक वाघाये (साकोली), रामरतनबापू राऊत (आमगाव), अनंतराव देशमुख (रिसोड), तर राष्ट्रवादीचे दिलीप बन्सोड (तिरोडा) या उमेदवारांनीच रिंगणात कायम राहत बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com