बहीण, जावयासह पाच जणांची हत्या

अनिल कांबळे
सोमवार, 11 जून 2018

नागपूर : संपत्तीच्या वादातून मेव्हण्यानेच बहीण, जावाई, भाची आणि स्वतःच्या मुलासह पाच जणांचा सब्बलने वार करून खून केला. दिघोरीजवळील आराधनानगरात ही थरारक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली.
बहीण अर्चना पवनकर (वय 42), जावई कमलाकर मोतीराम पवनकर (वय 46), जावयाची आई मिराबाई (वय 68), भाची वेदांगी (वय 12) आणि मुलगा कृष्णा उर्फ गणेश विवेक पालटकर (वय 5) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. कमलाकर हे भाजपचे कार्यकर्ता होते. विवेक गुलाब पालटकर (वय 42, रा. नवरगाव, ता. मौदा) असे आरोपीचे नाव आहे.

विवेक पालटकर याला पत्नी सविता (वय 26) हिच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पाच वर्षे शिक्षा भोगून तो दोन महिन्यांपूर्वीच बाहेर आला होता. नवरगाव येथे असलेल्या वडलोपार्जीत 10 एकर जमीनीच्या हिस्सेवाटणीवरून आरोपीचा आणि बहिणीचा वाद सुरू होता. बहिणीने हिस्सा सोडण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने तिला कुटुंबासह संपवण्याचा कट रचला होता. याच हेतूने त्याने बहिणीच्या घरी मुक्‍काम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास पवनकर कुटुंबातील चार आणि स्वतःच्या मुलाला सब्बलने वार करून यमसदनी धाडले. सकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातील दोन मुली झोपेतून उठल्या असता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. या हत्याकांडातील आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur murder news

टॅग्स
फोटो गॅलरी