esakal | दर्शनरांगेतील भाविकांना बसण्यासाठी पत्र्याची शेड
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur-Temple

दर्शनरांगेतील भाविकांना बसण्यासाठी पत्र्याची शेड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंढरपूर - आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने गोपाळपूर रस्त्यालगत 10 पत्राशेड उभारल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना तासन्‌तास उभे राहावे लागू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने यंदा पत्राशेडमध्ये बसण्याची सोय प्रथमच करण्यात आली आहे.

आषाढी यात्रेचा सोहळा काही दिवसांवर आल्याने प्रशासनाकडून चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, दर्शन मंडप, वाखरी पालखीतळ, गोपाळपूर रस्त्यालगतची पत्राशेड आदी ठिकाणी विविध सोई-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. श्री विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत पत्राशेडमध्ये चांगले बदल करीत भाविकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पत्राशेडमधील सुविधा
* भाविकांना बसण्याची सोय
* 24 तास पिण्याचे पाणी
* 2 मोठे स्क्रीन व 20 एलसीडी टी.व्ही.
* आपत्कालीन मदत केंद्र
* सीसीटीव्ही यंत्रणा
* पोलिस पथकाची निगराणी
* सुलभ शौचालयाची सुविधा
* हायमॉस्ट लॅम्प व जनरेटर