esakal | #SaathChal लखपती होण्याची आज शेवटची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

SaathChal

...असा बनवा व्हिडिओ
‘साथ चल’ उपक्रमाला गीत, संगीत अन्‌ नृत्याची जोड दिली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुटुंबीयांसमवेत दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा आहे. यामध्ये पारंपरिक रचनेवर आधारित गायन, संगीत, नृत्य, भजन, अभंग किंवा संतरचना यापैकी एक कला सादर करायची आहे. हा व्हिडिओ ‘सकाळ’कडे आज बुधवारपर्यंतच पाठवायचा आहे.

#SaathChal लखपती होण्याची आज शेवटची संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या अग्रगण्य संस्थांनी गायन, संगीत, नृत्याची जोड देत अनोखी स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होऊन व्हिडिओ बनवून एक लाखासह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बुधवार (ता. १०) पर्यंत तुम्ही तयार केलेला व्हिडिओ ‘सकाळ’कडे पाठवून यात सहभागी होऊ शकतात. 

आपण आपल्या कुटुंबासह एकत्र यावे, हाच या स्पर्धेचा उद्देश आहे. आपल्या विश्‍वासार्हतेने महाराष्ट्राच्या मनात गेली ८७ वर्षे आपले अढळस्थान निर्माण करणाऱ्या ‘सकाळ’ने वारीच्या निमित्ताने गेल्या वर्षापासून ‘साथ चल’ उपक्रम सुरू केला अन्‌ त्यात आपल्या कुटुंबासमवेत वारीबरोबर काही अंतर चालण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा या उपक्रमात अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

भरघोस बक्षिसे... 
प्रथम - एक लाख रुपये 
द्वितीय - ७५ हजार रुपये 
तृतीय - ५० हजार रुपये 
उत्तेजनार्थ - १० हजार रुपये
(दहा बक्षिसे) 

...येथे पाठवा व्हिडिओ  
मोबाईल क्रमांक - ९१३००८८४५९ 

स्पर्धेच्या माहितीसाठी
अरुण सुर्वे - ९८८११९३३४०