पूरग्रस्तांसाठी 06 हजार 800 कोटींचे पॅकेज तयार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी ६ हजार ८०० कोटींचे पॅकज तयार केले असून ‍विक्रमी वेळेत पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे आज ध्वजारोहण केले. त्यावेळी ते बोल्ट होते. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मुंबई : पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी ६ हजार ८०० कोटींचे पॅकज तयार केले असून ‍विक्रमी वेळेत पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे आज ध्वजारोहण केले. त्यावेळी ते बोल्ट होते. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
 

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून तिन्ही सैन्यदले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत करुन अव्याहत काम  करुन करुन सुमारे ५ लाख नागरिकांची यशस्वीपणे केली सुटका केली. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 06 thousand 800 crore package ready for flood victims says CM