Coronavirus : राज्यात कोरोनाचा पहिला बळी मुंबईत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव प्रचंड प्रमाणात पसरला असून, राज्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आज (ता. १७) मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६४ वर्षीय व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव प्रचंड प्रमाणात पसरला असून, राज्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आज (ता. १७) मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६४ वर्षीय व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाचा महाराष्ट्रातील पहिलाच बळी असल्याने राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत देशात ३ मृत्यू झाले असून, राज्यातील हा पहिलाच बळी आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मृत पावलेले व्यक्ति नुकतेच दुबईहून परतले होते. गेले काही दिवस ते कोरोनावरील उपचार घेत होते. मात्र, या उपचारांना यश न मिळाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद 

देशात सर्वाधिक म्हणजे ३९ रूग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यापैकी एक मृत्यू कर्नाटकात तर दुसरा मृत्यू दिल्लीत झाला आहे. मृतांची ओळख सांगण्याची परवानगी नसल्याने त्यांच्याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 dies due to corona in Mumbai Maharashtra