esakal | कोरोना प्रतिबंधक लस कोणाला, कधी आणि कशी मिळणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

शासनाच्या आदेशाप्रमाणे ४५ वयापुढील सर्व नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन कर्मचारी यांना लस दिली जात आहे.

कोरोना प्रतिबंधक लस कोणाला, कधी आणि कशी मिळणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा सामना करण्यासाठी १८ वर्षापासून पुढील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय जाहीर झाला खरा, पण त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. गोंधळात टाकणाऱ्या या प्रश्‍नांबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. नागरिकांना पडणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे प्रशासनाच्या वतीने मिळतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णवाढीत भारताला दिलासा, चिंता मात्र कायम!

प्रश्‍न : १८ वर्षापासून पुढील प्रत्येकाला लस मिळणार का ?

उत्तर : होय. शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्‍न : १८ वर्षांपुढील नागरिकांना पुण्यात लस कधी मिळणार?

उत्तर : १ मे पासून शहरात लसीकरण सुरू झाले आहे. नोंदणी आणि उपलब्धतेनुसार ती मिळेल.

प्रश्‍न : १८ ते ४४ वयोगटासाठी महापालिकेने लसीकरणासाठी काय व्यवस्था केली आहे?

उत्तर : महापालिकेचे कमला नेहरू व राजीव गांधी रुग्णालय या दोनच केंद्रांवर येथेच सध्या लसीकरण होईल

प्रश्‍न : लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्‍यक आहे का?

उत्तर : होय

प्रश्‍न : नोंदणी कशी करावी?

उत्तर : शासनाच्या कोवीन, उमंग आणि आरोग्य सेतू ॲपवरून नोंदणी करता येते. त्यामध्ये तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्र निवडून नोंदणी करता येईल.

हेही वाचा: बंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले?

प्रश्‍न : नोंदणी करताना काय आवश्‍यक आहे?

उत्तर : नोंदणी करताना आधार नंबर आवश्‍यक आहे.

प्रश्‍न : नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर गेल्यास लस मिळेल का?

उत्तर : ऑनलाइन नोंदणी न करता केंद्रावर गेल्यास लस मिळणार नाही. त्यामुळे विनाकारण केंद्रावर गर्दी करू नये.

प्रश्‍न : या गटासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार आहे का?

उत्तर : राज्य शासनाकडून या गटासाठी लस उपलब्ध झाल्यास त्याचा विचार केला जाऊ शकतो.

प्रश्‍न : ४५ ते पुढील गटासाठी सध्या लसीकरणासाठी व्यवस्था काय?

उत्तर : शासनाच्या आदेशाप्रमाणे ४५ वयापुढील सर्व नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन कर्मचारी यांना लस दिली जात आहे. महापालिकेच्या ११० केंद्रावर लसीकरण केले जाते. पण सध्या लस नसल्याने लसीकरण बंद आहे.

प्रश्‍न : ४५ ते पुढच्या गटासाठी पालिकेचे सध्याचे नियम काय?

उत्तर : पहिला डोस हवा असल्यास ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, तसेच दुसरा डोससाठी पात्र असणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे.

loading image