Mumbai Crime: धक्कादायक! चालत्या वाहनातून चिमुरडीला दिलं फेकून अन् आईसोबत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Mumbai Crime: धक्कादायक! चालत्या वाहनातून चिमुरडीला दिलं फेकून अन् आईसोबत...

Mumbai Crime: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शनिवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका टॅक्सी चालकाने आई अत्याचार तर मुलीला कॅबमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दहा महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, महिला आणि तिची मुलगी पेल्हार येथून वाडा तहसीलच्या पोशेरे येथून कॅबमध्ये परतत होते.

हेही वाचा: Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय दिला 'या' सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

कॅबमध्ये इतर प्रवासीही होते. वाटेत कॅब चालक आणि इतर प्रवाशांनी तिचा विनयभंग केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेने विरोध केल्यावर त्यांनी तिच्या लहान मुलीला हिसकावले आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कॅबमधून बाहेर फेकले. मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेलाही चालत्या कॅबमधून ढकलून खाली फेकण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: ठाकरे गटातील नेत्याकडून शिंदे गटातील आमदाराच कौतुक; चर्चांना उधान

त्यामुळे ती जखमी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :policecrimeMumbai