राज्यात अफवेचे 10 बळी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - धुळ्यातील राईनपाडा येथे रविवारी (ता. 1) मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून पाच जणांची ठेचून हत्या झाल्याने संपूर्ण देश हादरला असला, तरी अशा अफवेमुळे दीड महिन्यात महाराष्ट्रात 10 जणांचा बळी गेला आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या अफवांमुळे 14 मारहाणीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणांत 60 जणांना अटक झाली आहे. देशभरातच मुले पळवून नेणाऱ्या टोळीबाबत व्हॉट्‌सऍप व फेसबुकवर मेसेज फिरत आहेत. यामुळे देशभरात मारहाणीच्या घटना घडत आहेत. राईनपाड्यातही त्याची पुनरावृत्ती घडली.

मुंबई - धुळ्यातील राईनपाडा येथे रविवारी (ता. 1) मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून पाच जणांची ठेचून हत्या झाल्याने संपूर्ण देश हादरला असला, तरी अशा अफवेमुळे दीड महिन्यात महाराष्ट्रात 10 जणांचा बळी गेला आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या अफवांमुळे 14 मारहाणीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणांत 60 जणांना अटक झाली आहे. देशभरातच मुले पळवून नेणाऱ्या टोळीबाबत व्हॉट्‌सऍप व फेसबुकवर मेसेज फिरत आहेत. यामुळे देशभरात मारहाणीच्या घटना घडत आहेत. राईनपाड्यातही त्याची पुनरावृत्ती घडली. सोशल मीडियावरील अफवांमुळे औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बीड, परभणी, नांदेड, लातूर, गोंदिया, चंद्रपूर आदी ठिकाणी अनोळखी व्यक्तींना संशयावरून मारहाण झाली आहे. अशा 14 घटनांत 18 जण जखमी झाले आहेत. महिलांनाही मारहाण झाली आहे. 
 

Web Title: 10 victims of the state