टोमॅटो उत्पादकांना 100 कोटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

नारायणगाव - मागील दोन महिन्यांपासून टोमॅटो, कांदा या प्रमुख पिकांसह वांगी, कोबी, फ्लॉवर, काकडी, कलिंगड या उन्हाळी पिकांचे बाजारभाव घटल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. नीच्चांकी बाजारभावामुळे वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटोच्या बागा सोडून दिल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील सुमारे दहा हजार एकर क्षेत्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका बसला आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी या वर्षी फेब्रुवारी ते मार्चदरम्यान उन्हाळी हंगामासाठी संकरित टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.

नारायणगाव - मागील दोन महिन्यांपासून टोमॅटो, कांदा या प्रमुख पिकांसह वांगी, कोबी, फ्लॉवर, काकडी, कलिंगड या उन्हाळी पिकांचे बाजारभाव घटल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. नीच्चांकी बाजारभावामुळे वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटोच्या बागा सोडून दिल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील सुमारे दहा हजार एकर क्षेत्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका बसला आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी या वर्षी फेब्रुवारी ते मार्चदरम्यान उन्हाळी हंगामासाठी संकरित टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. उन्हाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला. मात्र, बाजारभावात वाढ झालेली नाही. सध्या सुमारे दहा हजार एकर क्षेत्रातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू आहे. मोठ्या आकाराच्या उच्च प्रतीच्या टोमॅटो क्रेटला येथील उपबाजारात पन्नास ते साठ रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. मध्यम प्रतीची टोमॅटो टाकून द्यावी लागत आहेत.

भाजीपाला मातीमोल 
वांगी, काकडी, कोबी, फ्लॉवर आदी उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना प्रतिकिलो पाच ते सात रुपये भाव मिळत आहे. वाहतूक, कडता, दलाली, तोडणी मजुरी, पॅकिंग आदींसाठी प्रतिकिलो दहा रुपये खर्च येतो. सध्याच्या बाजारभावामुळे तोटा सहन करावा लागत असल्‍याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.

Web Title: 100 Crore losses to tomatoes growers