esakal | चेरापुंजीला मागे टाकत कोयना धरणातील पाणीसाठ्याची 'सेंच्युरी'
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

शंभर दिवस ओलांडलेल्या पावसाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

चेरापुंजीला मागे टाकत कोयना धरणातील पाणीसाठ्याची 'सेंच्युरी'

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : शंभर दिवस ओलांडलेल्या पावसाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. १०३ दिवसांत महाबळेश्वरला (Mahabaleshwar) मागे टाकत नवजा व वलवण या पाणलोट क्षेत्रात शंभर टक्के पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर व पाटण तालुक्यातील कोयना (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रातील वलवण व नवजा या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. चेरापुंजीनंतर (Cherrapunji) देशात पहिल्या चार ठिकाणी सातारा जिल्ह्यातील तीन ठिकाणीची सर्वाधिक पावसाची नोंद झालीय.

१०० दिवसांत चार ठिकाणी सर्वाधिक पडलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) सातारा जिल्ह्याची ओळख चेरापुंजी बनली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसाचे माहेरघर म्हणून महाबळेश्वरला ओळखलं जात होते. महाबळेश्वरला मागे सारत नवजा या ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाला असून हे ठिकाण थंड हवेचे नवे ठिकाण म्हणून उदयास आलेय. या ठिकाणी जून ते ऑक्टोबर या चार महिन्यातील १ जून ते ९ सप्टेंबर या १०३ दिवसांत नवजात पाच हजार १५८ मिलीमीटर, वलवणला पाच हजार ९१४ तर महाबळेश्वरला पाच हजार १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

हेही वाचा: 'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

वाई तालुक्यातील जोर येथे सहा हजार ५२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग १५ वर्ष ७ ते ६ हजार मिमी पाऊस पडला आहे. सलग १५ वर्ष ओव्हरफ्लो झालेल्या कोयनेतून हजारो टीएमसी पाणीसाठा विनावापर वाया गेला आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आठ टीएमसी पाणी साठ्याची गरज आहे. धरणातून आत्तापर्यंत ३५.५६ टीएमसी विनावापर तर सात टीएमसी पायथा वीजगृहातून असे ४२.५६ टीएमसी पाणी सोडण्यात आलेय. धरणात सध्या १०० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

loading image
go to top