दहा हजार तरुणांना रोजगाराचे ‘स्टार्टर’!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

राज्यातील दहा हजार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आता वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सेवा क्षेत्रातील ओला कंपनीसोबत विभागाने बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

मुंबई - राज्यातील दहा हजार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आता वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सेवा क्षेत्रातील ओला कंपनीसोबत विभागाने बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

ओला कंपनीमार्फत देशभरात ॲप आधारित वाहन सेवा चालविण्यात येत आहे. मोठ्या शहरांमध्ये या सेवेला मोठी मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपनीकडून वाहन असणाऱ्या व्यक्तीस व्यवसाय करण्याची संधी देण्यात येते; परंतु हे वाहनचालक कोणत्याही प्रकारचे कौशल्याधारित प्रशिक्षण घेत नाहीत. यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज ओळखून कौशल्य विकास विभागाने ओला कंपनीसोबत बेरोजगारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10000 youth employment starter