परीक्षेसाठी १०७ केंद्रे अन्‌ भरारी पथके अवघी तीन! वर्गातील CCTV कागदावरच; २३ सप्टेंबरपासून परीक्षा, अभियांत्रिकीची परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा २३ सप्टेंबरपासून घेण्याचे नियोजित आहे. माळशिरस, सांगोला, अक्कलकोट, बार्शी, अशा तालुक्यांमध्ये विद्यापीठाची १०७ परीक्षा केंद्रे आहेत. येथील गैरप्रकार रोखण्यासाठी फक्‍त तीन भरारी पथके आहेत.
Maharashtra SSC Exams
Maharashtra SSC Exams Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा २३ सप्टेंबरपासून घेण्याचे नियोजित आहे. माळशिरस, सांगोला, अक्कलकोट, बार्शी, अशा तालुक्यांमध्ये विद्यापीठाची १०७ परीक्षा केंद्रे आहेत. येथील गैरप्रकार रोखण्यासाठी फक्‍त तीन भरारी पथके आहेत. तसेच काही केंद्रांवरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्‍ही कॅमेरेच नाहीत, त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकार कसे रोखणार हा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सोलापूर विद्यापीठाने नुकतेच २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे, पण अजूनही पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात त्यांचेच प्राध्यापक घेतात हे विशेष. १ ऑक्टोबरपासून पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांची तर ३१ ऑक्टोबरपासून अभियांत्रिकीची परीक्षा सुरू होणार आहे. याचे नियोजित वेळापत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर अपलोड केले आहे. दुसरीकडे विद्यापीठाशी संलग्निता घेतानाच त्या महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक आहे. पण, परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गात कॅमेरेच नाहीत अशीही वस्तुस्थिती आहे. विद्यापीठाच्या दबावामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही लावले आहेत.

दरम्यान, विद्यापीठ केगाव येथे आणि परीक्षा केंद्र माळशिरस, सांगोला, अक्कलकोट, बार्शी, अशा तालुक्यांमध्ये आहेत. त्यामुळे तीन भरारी पथकातील अधिकारी १०० ते १२५ किमी अंतर पार करेपर्यंत पेपर सुटायचा, अशीही स्थिती आहे. तसेच त्या तीन पथकांना दररोज बहुतेक परीक्षा केंद्रांना भेटी द्यायलासुद्धा वेळ मिळत नाही हा दरवर्षीचाच अनुभव आहे. केंद्रांवरील प्रत्येक वर्गात कॅमेरे नाहीत, भरारी पथके अपुरी, यामुळे परीक्षेत गैरप्रकार होतात. त्यामुळे भरारी पथकांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे.

विद्यापीठ परीक्षेची स्थिती

  • एकूण विद्यार्थी

  • ७५,०००

  • परीक्षा केंद्रे

  • १०७

  • भरारी पथके

  • परीक्षेला प्रारंभ

  • २३ सप्टेंबर

परीक्षा फॉर्म २० ऑगस्टनंतर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा २३ सप्टेंबरपासून आहे. साधारणतः परीक्षेच्या एक महिना अगोदर परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते. या पार्श्वभूमीवर २० ऑगस्टपासून परीक्षेचे अर्ज भरून घेतले जातील, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तुर्तास, परीक्षेचे नियोजित वेळापत्रक निश्चित झाले आहे, पण परीक्षा फॉर्म कधीपासून भरायला सुरवात होईल हे निश्चित झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com