राज्यातील 108 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व विषय शिक्षक अशा एकूण 108 जणांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्राथमिकचे 38 तर माध्यमिकच्या 39 शिक्षकांचा समावेश आहे. येत्या पाच सप्टेंबरला म्हणजेच शिक्षक दिनादिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

सोलापूर- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व विषय शिक्षक अशा एकूण 108 जणांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्राथमिकचे 38 तर माध्यमिकच्या 39 शिक्षकांचा समावेश आहे. येत्या पाच सप्टेंबरला म्हणजेच शिक्षक दिनादिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. राज्य शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षक पुरस्कारासाठी 2014 पासून रोख एक लाख रुपये दिले जातात. यंदा जाहीर झालेल्या 108 शिक्षकांमध्ये 18 शिक्षक हे आदिवासी क्षेत्रात काम करणारे आहेत.

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार राज्यातील आठ महिला शिक्षिकांना देण्यात येणार आहे. दोन विशेष शिक्षक, एक अपंग, एक गाइड व एका स्काऊट शिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

Web Title: 108 Teachers awarded in the State