10-12 वी विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षाशुल्क परत मिळणार | SSC-HSC Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ssc hsc exam

10-12 वी विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षाशुल्क परत मिळणार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. मंडळाने याबाबत परिपत्रक काढून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. काय म्हटलंय परिपत्रकात...

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सूचना

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण तसा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. परीक्षा शुल्क परताव्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिपत्रक काढून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.

हेही वाचा: भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली -नवाब मलिक

12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा: रिझर्व्ह बँकेच्या दोन योजनांचा पंतप्रधान मोदींनी केला शुभारंभ

loading image
go to top