भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली -नवाब मलिक | Nawab malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली -नवाब मलिक

- सुशांत सावंत

मुंबई: "भाजपाच्या (Bjp) एका माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप (Temple land) केली आहे" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी केला. "ज्यांनी ईश्वराच्या नावावर जमिनी घेतल्या, घोटाळा केला. त्या सगळ्यांना तुरुंगात टाका. ईडीने यात सहकार्य करावं" असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. "भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली. त्याचा भांडाफोड करणार" असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

"नवाब मलिक घाबरला आहे, असं ज्यांना वाटतं, ते चुकीच आहे. नवाब मलिक घाबरणार नाही. शेवटपर्यंत लढाई घेऊन जाणार. 'चोरोने हैं ललकारा मिलेगा करारा जबाब'" असं मलिक यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून शाहरुखने केली 'या' विश्वासू व्यक्तीची निवड

"काल दुपारपासून माध्यमातून अफवा पसरवण्याचे काम काही सरकारी यंत्रणा करत आहेत. नवाब मलिक ईडीच्या रडारवर आहे, असं सांगितलं जात आहे. ईडीने अफवा पसरवू नये. पत्रकार परिषद घेऊन ईडीने खरं काय ते सांगावे" असे मलिक म्हणाले.

हेही वाचा: T20 WC - पाकच्या पराभवानंतर अख्तरला शब्द सुचेनात; पाहा VIDEO

"तुम्ही कोणाची प्रतिमा खराब करु शकत नाही. वरिष्ठांना खूष करण्यााठी खेळ खेळला जातोय. ईडी सहकार्य करत असेल, तर आम्ही स्वागत करतो. सात प्रकरणात आम्ही एफआयआर दाखल केलाय. वक्फ बोर्डात क्लीनअप सुरु आहे. वक्फ बोर्डातील मलिकांचा घोटाळा बाहेर काढू, असं भाजपवाले सांगत आहेत" असे मलिक म्हणाले.

loading image
go to top