तुमच्याकडे 'ही' 11 ओळखपत्रे आहेत? मग करता येईल मतदान!

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : मतदारयादीमध्ये नाव आहे; मात्र मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांना आता इतर 11 छायांकित ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. हा निर्णय मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतल्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

मतदारयादीत नाव असते; परंतु मतदानकार्ड नसते; तसेच मतदारयादीत नव्याने नावाचा समावेश झालेला असतो; परंतु मतदान ओळखपत्र मिळलेले नसल्याने अनेकदा मतदान करता येत नाही. परिणामी मतदानाची टक्केवारी घटते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्रासह इतर 11 छायांकित ओळखपत्रांना मतदान करण्यासाठी पुरावा म्हणून मान्यता दिली आहे. 
यात पासपोर्ट, वाहनचालक परवाना, केंद्र किंवा राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तऐवेज, खासदार आमदार-विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यांचा समावेश आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव आहे; मात्र ओळखपत्र नाही, म्हणून कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, म्हणून इतर 11 छायांकित ओळखपत्रांचा पुरावा गृहीत धरला जाणार आहे. 

स्वीपअंतर्गत मतदारांना व्हिजिटिंग कार्ड जनजागृती 
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदारांना व्हिजिटिंग कार्ड देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या व्हिजिटिंग कार्डवर मतदानासाठी मतदारयादी नाव असल्यास, मतदान ओळखपत्र नसल्यास इतर 11 छायांकित ओळखपत्रांची माहिती देण्यात आली आहे. हे स्वीपर व्हिजिटिंग कार्ड एलआयसी ऑफिस, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, न्यायालय, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, पोलिस अधीक्षक कार्यालय, शासकीय बॅंक, खासगी दवाखाने यांच्यामार्फत; तसेच जालना शहर स्वीप टीम प्रत्यक्ष भेटून वाटप करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com