निराधार मुलांना आता दरमहा ११०० रुपये। बाल संगोपन योजनेतून अर्थसहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay
निराधार मुलांना आता दरमहा ११०० रुपये। बाल संगोपन योजनेतून अर्थसहाय्य

निराधार मुलांना आता दरमहा ११०० रुपये! बाल संगोपन योजनेतून अर्थसहाय्य

सोलापूर : ज्या मुलांना आई किंवा वडील नाहीत, ज्या मुलांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा निराधार ० ते १८ वयोगटातील मुलांना शासनाच्या बालसंगोपन योजनेतून दरमहा अकराशे रुपयांची मदत दिली जाते. एकाच कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना या योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील, शहरातील मुलांना या योजनेचा लाभ मिळतो.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, अंकगणित जमेना! गुणवत्तावाढीसाठी आता ‘सेतू’चा आधार

पालकांविना निराश्रित असलेल्या मुलाला त्याच्या वयाच्या १८ वर्षांपर्यंत दरमहा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील महिला व बालसंगोपन विभागाच्या माध्यमातून निराधार, निराश्रित मुलांसाठी ही योजना राबविली जाते. योजनेसाठी आलेले अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी बाल कल्याण समिती आहे. या समितीच्या माध्यमातून लाभ देताना जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे बोनाफाइड सर्टिफिकेट असणे आवश्‍यक आहे. अनेक निराधार, गरजू बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्ह्यातील एक हजार ६०० मुलांना सध्या या योजनेतून दरमहा अकराशे रुपयांची मदत मिळत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात अनाथ झालेल्या (दोन्ही पालकांचा मृत्यू) १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण रक्कम जिल्हाधिकारी व संबंधित विद्यार्थ्याच्या एकत्रित बॅंक खात्यात ठेवली. सोलापूर जिल्ह्यातील ४२ मुलांच्या दोन्ही पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील ३५ मुलांनाच शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत मिळाली आहे. पण, अजूनही सात मुलांना पाच लाखांची मदत मिळालेली नाही. शासन स्तरावर निधी नसल्याचे कारण आता त्या निराधारांना सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाने दोन्ही पालक गेल्याच्या धक्क्यातून सावरणाऱ्या चिमुकल्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा: गुणवत्तेची चिंता! कोरोनामुळे अंगणवाड्यातील ८० हजार चिमुकली थेट पहिली-दुसरीत

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे...

आधार कार्ड (पालकाचे व बालकांचे), शाळेचे बोनाफाइड सर्टिफिकेट, तलाठ्याचा उत्पन्न दाखला, पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, पालकांचा रहिवासी दाखला, मुलांचे बँक पासबुक, मृत्यूचा अहवाल, रेशन कार्ड, घरासमोरील पालकासोबत बालकांचा फोटो, मुलांचे फोटो.

Web Title: 1100 Per Month For Destitute Children Financing From Childcare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..