गुणवत्तेची चिंता! कोरोनामुळे अंगणवाड्यातील ८० हजार चिमुकली थेट पहिली-दुसरीत

कोरोनामुळे मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. तीन वर्षांत त्या वर्गातील मुले केवळ ६० दिवसच शाळेत गेली. बहुतेक मुले शिक्षणापासून दूरच राहिली. घराजवळील अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेली चिमुकली आता थेट पहिली, दुसरीच्या शाळेत गेली आहेत.
School
Schoolesakal

सोलापूर : कोरोनामुळे मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. तीन वर्षांत त्या वर्गातील मुले केवळ ६० दिवसच शाळेत गेली. बहुतेक मुले शिक्षणापासून दूरच राहिली. घराजवळील अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेली चिमुकली आता थेट पहिली, दुसरीच्या शाळेत गेली आहेत. त्यातील बहुतेक मुलांना अंकगणित, वाचन, लेखन काहीच येत नसल्याने त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. अशा चिमुकल्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

School
राज्यात सत्तापालट होणार? बंडखोर ४१ आमदारांमुळे ठाकरे सरकार अल्पमतात

कोरोनाच्या संकटानंतर अनेक पालकांनी त्यांची मुले इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाला घातले आहेत. तर काहींनी मुलांची गुणवत्ता वाढेल म्हणून इंग्रजी माध्यमांना पसंती दिली आहे. कित्येक वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची संख्या वाढली आहे. पण, कोरोनामुळे दोन वर्षे घरी बसून राहिलेल्या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विशेष तास घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या पालकांकडे ॲन्ड्राईड मोबाइल होते, त्यांच्या मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. पण, हातावरील पोट असलेल्या पालकांच्या मुलांचे काय, या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. अजूनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी १०० टक्के नाही. कोरोनामुळे अनेक घटकांचे मोठे नुकसान झाले, पण देशाची भविष्यातील ताकद, बलस्थान असलेल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेषत: गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यायला हवे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही शिक्षकांना तसे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षकांना आता शाळेच्या वेळेत वैयक्तिक कारणासाठी मोबाइल वापरता येणार नाही, असे आदेश त्यांनी दिले आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा घेतल्या जाणाऱ्या मूल्यमापन चाचणीनंतर जे विद्यार्थी अंकगणित, वाचन, लेखनात पिछाडीवर आहेत, त्या मुलांच्या प्रगतीसाठी विशेष नियोजन करावे लागार आहे. अंगणवाड्यातून पहिली, दुसरी किंवा पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, हे निश्चित.

School
शिवसेना आमदारांच्या बंडाचे नेमके 'हे' आहे कारण! भाजपच्या मदतीशिवाय आमदारकी अशक्य

पालकांनी गुणवत्तेबाबत विचारावा जाब

जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी सर्वच शिक्षकांचे मोठे योगदान आहे. तरीपण, ज्या पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीबाबत शंका असल्यास त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांच्या बैठकीत संबंधित शाळांना जाब विचारावा. मुलांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक विशेष लक्ष देत आहेत. शाळेची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असून शिक्षकांनी शाळा भरण्यापूवी अर्धातास अगोदर शाळेत येणे अपेक्षित आहे.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

School
‘फोन-पे’वर मागितली ‘API’ने लाच! १०० कोटीच्या वसुलीचा पोलिसांवरील पुसेना ठपका

जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती

एकूण अंगणवाड्या

४,२१४

दरवर्षी पहिलीत जाणारी मुले

३९,०००

झेडपी शाळातील पहिलीचे विद्यार्थी

३५,७००

इयत्ता दुसरीतील विद्यार्थी

३९,४००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com