उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

सध्या उजनी धरणात ११३ टीएमसी पाणी आहे. धरणातून भीमा नदीत चार हजार तर धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी देखील १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे, सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून ७०, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेक आणि बोगद्यातून ४०० क्युसेक पाणी सोडले आहे. डाव्या व उजव्या कालव्यांमध्ये २१०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
Ujjani Dam :दमदार पावसानंतर भरले उजनी धरण
Ujjani Damsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या उजनी धरणात ११३ टीएमसी पाणी आहे. धरणातून भीमा नदीत चार हजार तर धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी देखील १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे, सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून ७०, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेक आणि बोगद्यातून ४०० क्युसेक पाणी सोडले आहे. डाव्या व उजव्या कालव्यांमध्ये २१०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. नदीतील पाणी १५ फेब्रुवारीपर्यंत तर कालव्यातील पाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन १७ जानेवारीला सोडले. त्यावेळी भीमा नदीतूनही पाणी सोडण्याची मागणी झाली. गुरुवारपासून (ता. ५) नदीतूनही पाणी सोडले आहे. त्यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यांना लाभ होणार आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा देखील या पाण्याने भरणार आहे. आता उन्हाळ्यात एकदा भीमा नदीतून पाणी सोडले जाईल.

तत्पूर्वी, शेतीला यंदाच्या उन्हाळ्यात दोन आवर्तने मिळणार आहेत. पुढील आवर्तन मार्चअखेर आणि तिसरे आवर्तन एप्रिलअखेर सोडण्याचे नियोजित आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर फेब्रुवारीअखेर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यात उन्हाळ्यातील आवर्तनाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

औज बंधारा फुकटात भरणार

दरवर्षी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी तीन ते चारवेळा पाणी सोडावे लागत होते. त्यासाठी भीमा नदीतून १८ ते २० टीएमसी पाणी सोडले जायचे. त्यासाठी महापालिकेला पैसे मोजावे लागत होते. आता समांतर जलवाहिनी झाल्याने भीमा नदीतून सोलापूर शहराला पाण्याची आवश्यकता नाही. आता जलवाहिनीतूनच पाणी घेतले जात आहे. दुसरीकडे, औज बंधारा कोरडा पडला, तरी महापालिकेने नदीतून पाणी सोडण्याची मागणी केली नाही. मात्र, आता नदी काठावरील शेतकरी व गावांच्या मागणीवरून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यातून औज बंधारा आपोआप भरणार असून, त्यासाठी महापालिकेला एक रुपयाही जलसंपदा विभागाला द्यावा लागणार नाही, अशी स्थिती आहे.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणी

  • ११३ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ४९.२० टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ९२ टक्के

  • कालव्यातून सोडलेले पाणी

  • २१०० क्युसेक

  • नदीतून सोडलेले पाणी

  • ४००० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com