वेडाही कधी शहाण्यासारखे बरळतो - शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिज सईदने केलेल्या ‘भारतासोबतचे सर्व संबंध तोडून टाका‘ या वक्तव्यावर ‘वेडा व माथेफिरूही कधी कधी शहाण्यासारखे बरळतो‘ असे म्हणत शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखाद्वारे भाष्य केले आहे.

मुंबई - लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिज सईदने केलेल्या ‘भारतासोबतचे सर्व संबंध तोडून टाका‘ या वक्तव्यावर ‘वेडा व माथेफिरूही कधी कधी शहाण्यासारखे बरळतो‘ असे म्हणत शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखाद्वारे भाष्य केले आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, "ज्या भूमीने हिंदुस्थानला रक्ताचे अश्रू वाहायला लावले त्या भूमीवर जाऊन ‘धंदा‘ करणे, पैसा कमावणे "हराम‘ मानायला हवे. हाफिज सईदने हिंदुस्थानकडून होणाऱ्या व्यापारांवर बंदी आणण्याची मागणी केली. वेडा व माथेफिरूही कधी कधी शहाण्यासारखे बरळतो. पाकिस्तानसाठी पायघड्या घालणाया सगळ्यांनाच हा इशारा आहे.‘ तसेच हाफिज सईद यांचे पंतप्रधान नवाझ शरीफ हिंदुस्थानच्या पंतप्रधानांना पुन्हा "चाय पे चर्चा‘ चे आमंत्रण देणार असा आशावादही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.‘

तसेच "हाफिज सईदने मान्य केले की, कश्‍मीर खोऱ्यात मारला गेलेला बुऱ्हान वानी हा त्याच्या संपर्कात होता व कशश्‍मीरातील स्वातंत्र्यसैनिक होता. हाफिज सईदचे हे वक्तव्य येथील लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असले तरी पाकप्रेमींचे डोळे उघडण्याची शक्‍यता तशी कमीच दिसते. पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाका. व्यापार, खेळ, कला, राजनैतिक अशा संबंधांना तसा काहीच अर्थ उरलेला नाही. कारण पाकिस्तानचे शेपूट हे हिंदुस्थानच्या बाबतीत कायम वाकडेच राहणार आहे. मग त्यांचे ते कलाकार, क्रिकेटपटू वगैरे लोकांसाठी पायघड्या घालून कश्‍मीरातील आमच्या शहीदांचा अपमान का करायचा? आजही पाकिस्तानचे अनेक कलाकार हिंदी टी.व्ही. मालिकांत मुद्दाम घुसवले जातात. अशा मालिकांच्या निर्मात्यांनी हाफिज सईदचे हिंदुस्थानविरोधी वक्तव्य समजून घेतले पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीतील "खाना‘वळ त्यांच्या धंद्यासाठी पाकिस्तानात सिनेमे लावण्याची जी चमकोगिरी करते तो सर्वच प्रकार चिंताजनक आहे. पाकिस्तानने आमच्याकडे निरपराध्यांच्या रक्ताचे सडे पाडायचे, कश्‍मीरात एक देशद्रोही मारला म्हणून पाकिस्तानात काळा दिवस पाळायचा व त्याच पाकड्यांशी धंदा-व्यापार करून या मंडळींनी स्वत:चे खिसे गरम करायचे, ही काही देशभक्ती नाही.‘ अशी टीकाही अग्रलेखातून केली आहे.