युक्रेनमध्ये अडकले 1200 महाराष्ट्रातील तरुण! एअर इंडियाची युक्रेनमध्ये दोन विमाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अचानक युक्रेन मधून बाहेर पडावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजी सष्ट दिसत आहे पण घरापेक्षा जीव महत्त्वाचा
युक्रेनमध्ये अडकले 1200 महाराष्ट्रातील तरुण! एअर इंडियाची युक्रेनमध्ये दोन विमाने

युक्रेनमध्ये अडकले 1200 महाराष्ट्रातील तरुण! एअर इंडियाची युक्रेनमध्ये दोन विमाने

सोलापूर : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारच्या मदतीने परत आणले जात आहे. युक्रेनमध्ये जवळपास बाराशे तरुण अडकल्याची अंदाजित माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे प्राप्त झाली आहे. त्या मुलांच्या पालकांना संपर्क करून माहिती दिली जात असून मुलांशी संपर्क झाल्यास त्याची माहिती देण्याचेही आवाहन केले जात आहे. आज (शनिवारी) रुमानियातील बुखारेस्ट आणि हंगेरीतून एअर इंडियाची दोन विमाने भारतात येत आहेत, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचा: रशिया युक्रेन युद्धाचा सोन्याच्या दरावर परिणाम; तोळ्याला एक हजारांनी घट

 • आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियोजन...
  - आतापर्यंत जवळपास सातशे तरुणांची माहिती मिळाली
  - युक्रेनमध्ये अंदाजित बाराशे तरुण अडकल्याची माहिती
  - परराष्ट्र मंत्रालय व युक्रेनमधील भारतीय दुतावासांकडे दिली तरुणांची लिस्ट
  - प्रत्येकी 240 तरुणांना घेऊन दोन विमाने आज दिल्ली व मुंबई विमानतळावर येणार
  - रस्त्यावर हिंडू नका, सुरक्षित ठिकाणी राहा, बॉर्डरपर्यंत नेण्यासाठी वाहनांची सोय करण्याची ग्वाही

हेही वाचा: 'महापालिका तुम्हाला हवी असेल तर आम्ही धुणीभांडी करू का?'

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण असून भारतीयांना मायदेशी परतण्याची चिंता लागली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना परत आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला राज्यातील तरुणांची माहिती दिली आहे. तत्पूर्वी, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून युक्रेनमधील तरुणांची माहिती मागविली जात आहे. त्यामध्ये तरुणाचे संपूर्ण नाव, राहण्याचे ठिकाण आणि सध्याचे लोकेशन, याचा समावेश आहे. त्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून सद्यस्थितीची माहिती त्यांना दिली जात आहे. दरम्यान, मुलांनी रस्त्यावर हिंडू नये, मोबाइल चार्जिंग संपणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्या मुलांना केले जात आहे. भारतातून त्याठिकाणी आलेल्या विमानाची माहितीही त्यांना दिली जात आहे. ज्या तरुणांशी संपर्क होतोय त्यांना आणि ज्यांच्या पालकांनी मुलांशी संपर्क साधला आहे, त्यांना आवाहन केले जात आहे. युक्रेनमधून भारतात आलेल्या प्रत्येकाची विमानतळावर मोफत आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. तसेच त्या तरुणांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचीही व आर्थिक मदत करण्याचीही भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.

हेही वाचा: ''पप्पा मला घरी यायचंय''; युक्रेनमधील विद्यार्थांची आर्त हाक

दिल्लीच्या विमानात 30 महाराष्ट्रीयन
एअर इंडियाची दोन विमाने युक्रेनमध्ये गेली आहेत. त्यातील एक विमान रुमानियातील बुखारेस्ट येथे तर दुसरे विमान हंगेरीत गेले आहे. बुखारेस्टवरुन येणारे विमान मुंबईला तर हंगेरीतून येणारे विमान दिल्ली विमानतळावर उतरेल. दिल्लीला उतरणाऱ्या विमानात महाराष्ट्रीतील 30 तरुण असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्य सरकारला दिली आहे. आता हंगेरीतून येणाऱ्या विमानात महाराष्ट्रातील किती तरुण आहेत, याची माहिती घेतली जात आहे.

हेही वाचा: पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल

युक्रेनमधील महाराष्ट्रातील तरुणांना सुरक्षितपणे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून एअर इंडियाच्या विमानातून त्या तरुणांना मायदेशी आणले जात आहे. अंदाजित बाराशे तरुण त्याठिकाणी असून आतापर्यंत जवळपास पाचशे तरुणांची माहिती प्राप्त झाली आहे.
- सुर्य कृष्णमुर्ती, अव्वर सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र

Web Title: 1200 Youths From Maharashtra Stranded In Ukraine Air India Has Two Aircraft In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top