राज्यात आज 1201 नव्या कोरोना बाधितांची नोंद; तर 8 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राज्यात आज 1201 नव्या कोरोना बाधितांची नोंद; तर 8 जणांचा मृत्यू

मुंबई : एकीकडे देशात ओमिक्रॉनची (Omicron In India) दहशत असताना राज्याच्या चिंतेतदेखील आज वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रूग्णांचा आकडा कमी होता. मात्र, बुधवारी राज्यात 1201 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Eight People die due to covid in maharashtra today) दुसरीकडे आज 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (1201 new corona cases recorded in maharashtra today)

राज्यात सध्या 7 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु असून, (Active corona cases in maharashtra) 75 हजार 273 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 860 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 318 लोकांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 6 हजार 317 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 6 हजार 906 जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालनायने जाहीर केली आहे. सध्या देशभरात 78 हाजर 190 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. ही आकडेवारी गेल्या 575 दिवसांतील सर्वात कमी आहे. (Total corona active cases in india)