Sugarcane : राज्यात १३ लाख टन उसाचे यंदा जास्तीचे गाळप

राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता. १८) एकूण १०६६.८६ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.
sugarcane
sugarcanesakal

पुणे - राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता. १८) एकूण १०६६.८६ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. आतापर्यंत पूर्ण झालेले उसाचे हे गाळप गेल्या वर्षीच्या ऊस गळीत हंगामात पूर्ण झालेल्या एकूण गाळपाच्या तुलनेत १२ लाख ९५ हजार मेट्रिक टनांनी अधिक आहे. दरम्यान, यंदाचा ऊस गळीत हंगाम अद्याप चालूच असून, आणखी ९ साखर कारखाने अद्याप सुरु आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदाच्या गळीत सुरु झालेले साखर कारखान्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी आतापर्यंत गाळप झालेला ऊस, उत्पादित झालेली साखर आणि साखर उतारा या सर्वच बाबींमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण १०५३.९१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. यंदाच्या हंगामात सरासरी साखर उतारा हा १०.२५ टक्के इतका असून, गतवर्षी तो १० टक्के होता. त्यामुळे यंदा साखर उताऱ्यात ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदाच्या गळीत हंगामात २०७ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरु केले होते. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. राज्याच्या साखर आयुक्तालयातून गुरुवारी (ता.१८) ही माहिती देण्यात आली. यंदाच्या ऊस गळीत हंगामात कोल्हापूर विभाग पहिल्यापासून आघाडीवर असून, या विभागातील आतापर्यंतचे ऊस गाळप हे सर्वाधिक झाले आहे.

विभागनिहाय पूर्ण झालेले उसाचे गाळप (लाख मेट्रिक टनमध्ये)

- कोल्हापूर --- २४१.०७ लाख मेट्रिक टन

- पुणे --- २३६.३३

- सोलापूर --- २१८.०८

- नगर --- १४०.७

- छत्रपती संभाजीनगर ---९८.४४

- नांदेड --- ११७.६७

- अमरावती --- ९.९७

- नागपूर --- ४.६

विभागनिहाय सरासरी साखर उतारा (टक्केवारीमध्ये)

- कोल्हापूर --- ११.५७ टक्के

- पुणे --- १०.५१ टक्के

- सोलापूर --- ९.३९

- नगर --- ९.९६

- छत्रपती संभाजीनगर ---८.९४

- नांदेड --- १०.२५

- अमरावती --- ९.४२

- नागपूर --- ६.५९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com