मनिषा कोइरालाला निसर्गरम्य नाशिकची भुरळ,त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मुक्काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नाशिक : "सौदागर' या 1991 मधील पहिल्या हिंदी चित्रपटापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मनिषा कोइरालाला निसर्गरम्य नाशिकने भुरळ घातली, काठमांडूमध्ये नेपाळच्या राजघराण्यात जन्मलेल्या मनिषाचे पशुपतीनाथ हे श्रद्धास्थान आहे. ती कुटुंबियांसमवेत त्र्यंबकेश्‍वरला श्रावणानिमित्त ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आली होती. 

मनिषाचे वडील प्रकाश, आई सुषमा यांच्या समवेत काल (ता. 21) रात्री नाशिकमध्ये तिचे आगमन झाले. हॉटेल एस. एस. के. सॉलिटेअरमध्ये कोइराला कुटुंबिय मुक्कामी होते. हॉटेलचे मालक शैलेश कुटे यांनी त्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत केले. संततधार सुरु असलेला पाऊस अन्‌ हवेतील गारवा मनिषाला सुखावून गेला. त्याचवेळी नाशिकचा परिसर हिरव्याकंच निसर्गराजीने फुलून गेला असल्याने कुटुंबियांशी संवाद साधताना त्यांनी नेपाळचे "फिलींग' येत असल्याचे सांगितले,श्री. कुटे म्हणाले, की मनिषाने नाशिकमधील मुक्काम "एन्जॉय' केला. एवढेच नव्हे, तर त्र्यंबकेश्‍वरला रवाना होत असतांना डिसेंबरमध्ये पुन्हा नाशिकला येऊ असे कुटुंबियांनी आवर्जून सांगितले. मनिषाने दुपारी कुटुंबियांसमवेत भोजन घेतले आणि त्र्यंबकेश्‍वरला सर्वजण रवाना झाले. त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन झाल्यावर सर्वजण मुंबईला जाणार आहेत.