चाैदा हजार शेतकऱ्यांच्या पाच वर्षांत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

शेतकरी आत्महत्या कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने उपाययोजना केल्या आहेत. आत्महत्यांचे प्रमाण मागील काही वर्षांत कमी झाले आहे, परंतु त्याची नेमकी आकडेवारी पाहावी लागेल.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

शासनाच्या उपाययोजनांमुळे मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्यात दरवर्षी सरासरी तीन हजार शेतकरी आत्महत्या करतात, असे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या कालावधीत राज्यात आघाडी सरकारच्या तुलनेत युती सरकारच्या काळात आत्महत्या वाढल्याचे दिसून येते. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अमरावती विभागात सर्वाधिक आहे.

शेतकरी आत्महत्या कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने उपाययोजना केल्या आहेत. आत्महत्यांचे प्रमाण मागील काही वर्षांत कमी झाले आहे, परंतु त्याची नेमकी आकडेवारी पाहावी लागेल.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Web Title: 14000 Farmer Suicide in Last Five Years