सोलापूर महापालिकेत १०२ जागांसाठी १४३० उमेदवार! अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस; बंडखोरांना स्वीकृत नगरसेवक अन्‌ ‘डीपीसी’वर संधी देण्याचे अनेकांना आश्वासन

महापालिकेतील १०२ नगरसेवकांसाठी १४३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात प्रमुख पक्षांचे अधिकृत अंदाजे ५०० उमेदवार वगळून सुमारे ८०० उमेदवार अपक्ष आहेत. त्यात शहर मध्य मतदारसंघातील ३५ जागांसाठी तब्बल ३५० जण इच्छुक आहेत. त्यातील अनेकांची मनधरणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली असून पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी अपक्षांवर पाळत ठेवून आहेत.
solapur ujani dam news
solapur mahapalikasakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेतील १०२ नगरसेवकांसाठी १४३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात प्रमुख पक्षांचे अधिकृत अंदाजे ५०० उमेदवार वगळून सुमारे ८०० उमेदवार अपक्ष आहेत. त्यात शहर मध्य मतदारसंघातील ३५ जागांसाठी तब्बल ३५० जण इच्छुक आहेत. त्यातील अनेकांची मनधरणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली असून पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी अपक्षांवर पाळत ठेवून आहेत. पक्षातील नाराज अपक्षांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्यांना विविध आश्वासने देण्यात आली आहेत.

सोलापूर शहरातील प्रभाग १२ ते १८, तसेच प्रभाग नऊ आणि अकराचा अर्धा भाग आणि प्रभाग २२ मधील ७० टक्के परिसर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात येतो. शहर मध्य मतदारसंघात एकूण ३५ नगरसेवक येतात. प्रभाग १२ मधून २९, प्रभाग १३ मधून ४४, प्रभाग १४ मधून सुमारे ३४, प्रभाग १५ मधून २६, प्रभाग १६ मधून ५२, प्रभाग १७ मधून तब्बल ५५, प्रभाग १८ मधून ३२ आणि प्रभाग २२ मधून ३१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, याच प्रभागातील नऊमधून देखील ४७ उमेदवार इच्छुक आहेत.

विशेष बाब म्हणजे भाजपमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील अनेकजण उमेदवारी मागे न घेण्यावर ठाम असल्याने गुरुवारी (ता. १) दिवसभर त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आमदारांनी व पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि त्या उमेदवाराच्या जवळच्या मित्रांच्या माध्यमातून समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. आता त्यातील कितीजण उमेदवारी अर्ज मागे घेणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

आमदार देवेंद्र कोठेंचे व्हिडिओतून आवाहन

‘भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झालेल्यांचे अभिनंदन. मतदारांना विनंती अशी, कमळ हाच आपला उमेदवार हे डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या चारही उमेदवारांना पक्षावर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करावे. उमेदवारी जाहीर झाल्यावर कोणी नातेवाईक म्हणून, कोणी मित्रपरिवार म्हणून, कोणी कालपर्यंत पक्षातील सहकारी असलेले सहकारी अन्य पक्षातून किंव अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील, तरी सर्वांनी कमळ हाच आपला उमेदवार असणार आहे. ज्या ज्या प्रभागात भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्या अधिकृत उमेदवारांचेच काम सहकाऱ्यांनी करायचे आहे, मतदारांनीही त्यांनाच मतदान करायचे आहे, धन्यवाद’.

अर्ज माघारीसाठी आज शेवटची मुदत

भाजपच्या उमेदवारांना सुकर दिसणारा विजय आपल्याच पक्षातील नाराज अपक्षांमुळे कठीण झाला आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये म्हणून त्या नाराजाने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्या अपक्षांना घरातून नॉर्थकोट मैदानापर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची मुदत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com