esakal | मोठी बातमी! शिवसेनेचे १५ आमदार भाजपच्या संपर्कात?
sakal

बोलून बातमी शोधा

15 mla of shivsena are in touch with bjp leaders maharashtra vidhan sabha 2019

शिवसेनेचे आमदार भाजपशी संपर्क ठेवून आहेत. ती संख्या 19 पर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत फार वेळ न लावता भाजपला पाठिंबा देण्याचा कौल आमदारांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! शिवसेनेचे १५ आमदार भाजपच्या संपर्कात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री कोणाचा यावरून भाजप-शिवसेना या महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये वाद सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तब्बल 15 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. तसे झाले तर, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नही पूर्ण होणार आहे आणि भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आज (सोमवार) दिल्लीत झालेल्या उच्चपदस्थांच्या बैठकीत या पर्यायाचा विचार झाला आहे.

राममंदिराबाबत शरद पवार काय म्हणाले?

सत्तास्थापनेत आपल्याला स्थान मिळणार नाही, अशी भावना असलेले शिवसेनेचे आमदार भाजपशी संपर्क ठेवून आहेत. ती संख्या 19 पर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत फार वेळ न लावता भाजपला पाठिंबा देण्याचा कौल आमदारांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. दबावतंत्र सुरू असल्याने आता ऑपरेशन लोटस सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्राशी संबंधित एक नेता अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या समवेत झालेल्या या बैठकीला हजर होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सेनेतील आमदार सातत्याने संपर्क ठेवून आहेत, अशी माहिती मिळत आहे. दिवाळी संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. शिवसेनेने सत्तेत समसमान वाटा हवा, असे आतापासूनच सांगायला सुरवात केली आहे. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री शिवसेनेचा अशी वक्तव्ये केलेली आहेत. तर, भाजपनेही मुख्यमंत्री आमचाच असेल असे स्पष्ट सांगितलेले आहे.

राष्ट्रवादीला पंक्चर गाडी म्हणणाऱ्यांना डॉ.अमोल कोल्हे यांचे प्रत्युत्तर

'युती'च्या निर्णयानंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची रणनीतीही निश्‍चित होईल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 तर काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार राजू पाटील निवडून आले आहेत. समाजवादी पक्षाने 2, बहुजन विकास आघाडी 3, तर एमआयएमने दोन जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या विधानसभेत 13 अपक्ष आमदार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अपक्ष आमदार आमच्यासोबत असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.