कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटींचे अनुदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य 
मंत्रीमंडळाने घेतला आहे. कांदा खरेदीचे भाव कोसळल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱयांमध्ये सरकार विरोधात जोरदार संतापाची लाट होती. या संतापाला शांत करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटीचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य 
मंत्रीमंडळाने घेतला आहे. कांदा खरेदीचे भाव कोसळल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱयांमध्ये सरकार विरोधात जोरदार संतापाची लाट होती. या संतापाला शांत करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटीचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कांद्याचे दर किलो मागे एक रूपयांपेक्षा कमी झाले होते. त्यामुळे प्रतिक्विंटल किमान 200 रूपयांचे अनुदान सरकारने द्यावे अशी मागणी होती. दरम्यान 11 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांद्यावर हे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, अशी धास्ती भाजप सरकारला वाटल्याने कांदा उत्पादकांना विशेष आर्थिक साह्य आणि वाहतूक अनुदान देण्याच्या पर्यायांवर सरकारने विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे समजते. 

विधानसभा निवडणुकांतील निकालांमुळे उत्साहित झालेले विरोधी पक्ष संसदेच्या चालू अधिवेशनात शेतकऱ्यांमधील असंतोषाचा विषय ठळकपणे उपस्थित करण्याची शक्यता आहे. कांदा दरातील घसरण हा त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Web Title: 150 cr Subsidy for onion producing farmers