154 जणांना 'पीएसआय' म्हणून सामावून घेणार : मुख्यमंत्री

154 peoples will join as PSI says CM Fadnavis
154 peoples will join as PSI says CM Fadnavis

मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील 154 जणांना पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. "या 154 जणांचें कुठलेही प्रमोशन नाही तर ते सरळ सेवेतून पीएसआय झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीत सामावून घेत आहोत," अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ''आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, 154 पीएसआयना ट्रेनिंग घेतल्यानंतरही न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करुन घेणे शक्य होत नव्हते. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलेही प्रमोशन नाही. हे रेग्यूलर एक्झाममधून आलेले पीएसआय आहेत. त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतले आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत," असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com