
कोरोना काळानंतर आयोगानं मोठ्या पदभरतीची घोषणा केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.
MPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; 161 पदांची होणार भरती
कोरोना काळानंतर (Coronavirus) आयोगानं मोठ्या पदभरतीची घोषणा केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (MPSC Rajya Seva Bharti 2022) मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केलीय. राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकूण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर..; संजय ठाकुरांचा थेट इशारा
परीक्षेचे नाव – राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022
पदाचे नाव –
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा : एकूण पदे 09
मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद : 22 पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी : 28 पदे
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क : 02 पदे
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क : 03 पदे
कक्ष अधिकारी : 05 पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : 04 पदे
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य : 88 पदे
पद संख्या – 161 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
हेही वाचा: आम्ही कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय; पटेलांनी काँग्रेसला फटकारलं
अर्ज शुल्क
अमागास – 544 रुपये
मागासवर्गीय – 344 रुपये
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 मे 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
Web Title: 161 Vacancies Will Be Filled Under Maharashtra Public Service Commission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..