राज्यातील 17 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील 17 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. तीन आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून रिक्त असलेल्या उत्तर प्रादेशिक विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून राजेश प्रधान यांची नेमणूक झाली आहे. 

मुंबई - राज्यातील 17 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. तीन आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून रिक्त असलेल्या उत्तर प्रादेशिक विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून राजेश प्रधान यांची नेमणूक झाली आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात अनुचित घटना घडू नयेत याची खबरदारी गृह विभागाने घेतली आहे. उत्तर प्रादेशिक विभागात (गोरेगाव ते दहिसर) गुन्हे वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. वर्षभरापूर्वी अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंग पाटील यांना बढती मिळाली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त चेरसिंग दोरजे यांच्याकडे होती. एकाच वेळी दोन्ही विभागांचे कामकाज आणि गुन्ह्यांच्या घटना पाहता उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पद भरणे गरजेचे होते. अखेर एका वर्षानंतर उत्तर प्रादेशिक विभागातील अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. परिमंडळ 7 चे उपायुक्त राजेश प्रधान यांना बढती मिळाली आहे. प्रधान हे आता उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्‍त आयुक्त असतील. 

सशस्त्र दलाचे उपायुक्त एम. के. भोसले आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या उपमहानिरीक्षक-संचालक (प्रशासन) या पदाचे काम पाहतील. मध्य रेल्वेच्या पोलिस उपायुक्त रूपाली अंबुरे यांची बदली ठाण्यात महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. अंबुरे यांनी रेल्वेत महिलांच्या सुरक्षेकरिता काही उपक्रम राबवले होते. 

नवीन पोलिस उपमहानिरीक्षक - राजेश प्रधान (अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई, उत्तर), एम. के. भोसले (संचालक, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ), पी. व्ही. देशपांडे (अतिरिक्त पोलिस आयुक्त पुणे, दक्षिण) 

नवे पोलिस अधीक्षक - एस. बी. पठारे (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई), एम. सुवेज हक (पुणे ग्रामीण), जय जाधव (पोलिस उपायुक्त, मुंबई), जे. श्रीधर (बीड), अनिल परसकर (रायगड), अंकुश शिंदे (पोलिस उपायुक्त, नाशिक), दत्ता करले (नाशिक ग्रामीण), प्रज्ञा जेडगे, (महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ), एन. एम. मित्तेवाड (कमांडंट एसआरपीएफ हिंगोली), पी. एम. वाडकर (पोलिस उपायुक्त, मुंबई), रूपाली अंबुरे (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ठाणे), समाधान पवार (पोलिस उपायुक्त, मध्य रेल्वे), महादेव तांबडे (पोलिस अधीक्षक, कोल्हापूर), तुषार पाटील (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, रेल्वे पोलिस, पुणे), विजय खरात (पोलिस अधीक्षक, सीआयडी, अमरावती), एम. राजकुमार (यवतमाळ), संभाजी कदम (पोलिस उपायुक्त, नागपूर) 
पोलिस अधीक्षक पदोन्नती - विनायक ढाकणे (नागरी हक्क संरक्षण दल, औरंगाबाद), महेश गट्टे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, रत्नागिरी) 

Web Title: 17 Police Commissioner of transfers