कांदा अनुदानासाठी लागणार 172 कोटी

Onion
Onion

राज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत 
सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले. त्यानुसार राज्यातील पाच लाख 68 हजार शेतकरी पात्र ठरले असून त्यांच्याकडून 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी सरकारने 172 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

खरीप वाया गेला अन्‌ पाण्याअभावी रब्बीच्या पिकांनीही माना टाकल्या. राज्यात पावसाअभावी दुष्काळ पडला आणि दुसरीकडे शेतमालांचे दर गडगडल्याने सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, हमीभाव केंद्रांवर नोंदणी करुनही तूर, हरभरा खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मागील वर्षी प्रतिक्‍विंटल एक हजारांचे अनुदान जाहीर केले होते. त्या अनुदानाची अद्यापही राज्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कांदा अनुदान कधीपर्यंत मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. 

कांद्याचे दर कमी झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले जात असून त्याची छाननी करुन लवकरच त्यांना अनुदान वितरीत केले जाणार आहे. 
- ए.एल.घोलकर, सहसंचालक, पणन विभाग 

राज्याची स्थिती 
आवकप्राप्त बाजार समित्या - 76 
एकूण शेतकरी - 5,68,605 
कांदा आवक - 85,77,108 क्‍विंटल 
अनुदानाची रक्‍कम - 171.54 कोटी 

जिल्हानिहाय पात्र शेतकरी 
सोलापूर : 54,605 शेतकरी 
नाशिक : 2,08,262 शेतकरी 
धुळे : 19,677 शेतकरी 
जळगाव : 7,375 शेतकरी 
अहमदनगर : 1,66,427 शेतकरी 
पुणे ग्रामीण : 62,454 शेतकरी 
कोल्हापूर : 11,522 शेतकरी 
सांगली : 10,124 शेतकरी 
सातारा : 6,599 शेतकरी 
औरंगाबाद : 8,144 शेतकरी 
अमरावती : 61 शेतकरी 
अकोला : 732 शेतकरी 
बुलढाणा : 781 शेतकरी 
लातूर : 914 शेतकरी 
उस्मानाबाद : 1,585 शेतकरी 
बीड : 8,993 शेतकरी 
नागपूर : 350 शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com