

Chimasaheb Maharaj Kolhapur his tomb in karachi pakistan maratha history
esakal
Kolhapur 1857 Revolt History : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात झाशीची राणी आणि मंगल पांडे यांचे नाव आदराने घेतले जाते, परंतु कोल्हापुरातही १८५७ साली क्रांतीचा मोठा वणवा पेटला होता. ३१ जुलै १८५७ रोजी कोल्हापुरातील २७ व्या पलटणीतील सुमारे २०० शिपायांनी ब्रिटिशांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. या उठावाचे नेतृत्व रामजी शिरसाट यांनी केले होते. क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर हल्ले चढवून ५० हजार रुपयांचा सरकारी खजिना ताब्यात घेतला आणि या संघर्षात तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खात्मा केला ज्यामुळे कोल्हापुरातून इंग्रजी सत्तेला मोठा धक्का बसला.